victory of Amol Kolhe Nilesh Lanke Bajrang Sonawane answer to Ajit Pawar lok sabha election 2024 Sakal
लोकसभा २०२४

अजित पवारांच्या दमबाजीला विजयातून प्रत्युत्तर; अमोल कोल्हे, नीलेश लंके, बजरंग सोनवणे यांनी मारले मैदान

मागील लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा आवाका काढला. तुझा आवाका किती? बोलतो किती? तू बोलतोय कोणाबरोबर?

सदानंद पाटील

Mumbai News : ‘तू निवडून कसा येतो, तेच पाहतो, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा धमकीवजा प्रसिद्ध झालेला ‘डायलॉग’ त्यांच्याच अंगलट आल्याचे या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी अशीच दमबाजी केली होती. मात्र लोकसभेच्या मैदानात त्यांच्या दमबाजीला ना उमेदवारांनी भीक घातली, ना जनतेने त्यांना गांभीर्याने घेतले. दमबाजीनंतरही अमोल कोल्हे, नीलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांनी लोकसभेचे मैदान मारले.

मागील लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा आवाका काढला. तुझा आवाका किती? बोलतो किती? तू बोलतोय कोणाबरोबर?, असे म्हणत आता तू निवडून येतोच कसा, असे म्हणत चांगलाच दम दिला होता.

एवढ्यावरच न थांबता अजित पवार यांनी पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांचा पराभव घडवून आणला. शिवतारे यांचा ठरवून झालेल्या पराभवाची राज्यभर चर्चा झाली. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून फारकत घेत महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तसेच बारामती मतदारसंघातून पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून उमेदवारीही घेतली.

सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी जिवाचे रान केले. ज्या विजय शिवतारे यांना पराभवाची धूळ चारली त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अजित पवारांची दमछाक झाली. एवढे करूनही सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न उलटला

अजित पवार यांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे, नीलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांनाही पराभूत करण्याची धमकी दिली होती. मात्र त्यांच्या या धमकीला कोल्हे आणि सोनवणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

सोनवणे यांनी तर पार्थ पवार यांच्या पराभवाची आठवण करून देत, आपल्या मतदारसंघाची काळजी करण्याचा सल्ला दिला होता. अखेरच्या क्षणापर्यंत अजित पवार यांनी या तिन्ही उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी झाले नाहीत.

शरद पवार यांच्या या तिन्ही उमेदवारांनी त्यांच्या-त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. कोल्हे यांनी शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा लाखाच्या फरकाने पराभव केला. नीलेश लंके यांनी नगर दक्षिणमधून भाजपच्या सुजय विखे तर बजरंग सोनवणे यांनी बीडमधून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT