East Vidarbha Polling sakal
लोकसभा २०२४

East Vidarbha Polling : कमी टक्केवारीने विदर्भात सर्वांचीच हवा गुल! शहरी भागात भाजप तर ग्रामीणमध्ये काँग्रेसला मतदान

विदर्भातील पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. नागपुरात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना होत असला तरी भाजपचे मतदान केंद्र नियोजन मजबूत असल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ वृत्तसेवा

अनिल यादव : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भातील पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. नागपुरात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना होत असला तरी भाजपचे मतदान केंद्र नियोजन मजबूत असल्याचे स्पष्ट झाले. गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्हा असला तरी त्याचा मतदानावर परिणाम झाला नाही. भंडारा-गोंदिया, रामटेक आणि चंद्रपूर येथे महायुती व महाविकास आघाडीत जोरदार लढत झाल्याने निकाल नक्की कुणाच्या बाजूने लागेल हे सांगता येणार नाही.

महाराष्ट्रातील नागपुरातील लढतीकडे देशाचे लक्ष लागून आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. सकाळीच पुरूष, पहिल्यांदा मतदान करणारे युवक बाहेर पडले. दुपारी महिला मतदानासाठी बाहेर पडल्या. रामटेकमध्ये शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस तळ ठोकून होते. खासदार कृपाल तुमाने यांची उमेदवारी कापत काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना पक्षात घेत शिवसेनेची उमेदवारी दिली.

पण, सक्षम उमेदवार न सापडल्याने बाहेरून उमेदवार आणला आणि उभा केला. त्यातही तुमानेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी होतीच. मतदारसंघात बौद्ध समाजाचे साडेसहा लाखांच्या आसपास मतदान आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) व काँग्रेस यांच्यात लढत रंगल्याने नक्की कोण विजयी होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

शहरी भागात भाजप तर ग्रामीणमध्ये काँग्रेसला मतदान झाले. त्यातच उमरेडमध्ये ६५ टक्‍क्यापेक्षा जास्त मतदान झाल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. एटापल्ली, अहेरी, कुरखेडा या भागात काँग्रेसकडे कल असल्याचे दिसून आले तर गडचिरोली, ब्रम्हपूर, चिमूरमध्ये भाजप चालला.

भंडारा-गोंदियात संथगतीने मतदान झाले. या मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचा उमेदवार रिंगणात असल्याने त्याचा फटका नक्की कुणाला बसेल, हे सांगता येणार नाही. काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकाच जातीचे आहेत. या मतदारसंघातील एकूण कल पाहता भंडारा, मोहाडी, तुमसर आणि गोंदिया या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले तर लाखनी, लाखांदूर, तिरोडा, साकोली आणि भंडारा येथे भाजपने बूथवाईज नियोजन करीत मतदारांना बाहेर काढले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकच खासदार चंद्रपूर मतदारसंघातून निवडून आला होता. यावेळेस भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरविले. पण, बल्लारपूर, राजुरा, वणी, वरोरा, चंद्रपूर मतदारसंघातील ग्रामीण भागात काँग्रेसला मतदान झाल्याचे चित्र आहे तर शहरात भाजप वरचढ दिसला. दरम्यान, २०१४ व २०१९ च्या तुलनेत यंदा मागासवर्गीय, मुस्लिम वस्त्या व झोपडपट्ट्यांमधील मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. एमआयएमने उमेदवार न दिल्याने मुस्लिमांची एकगठ्ठा मते पडली. अर्थात त्यांचा कल काँग्रेसकडे असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT