Lok Sabha 2024 eSakal
लोकसभा २०२४

Wardha Lok Sabha 2024 : भाजपचे तडस तिसऱ्यांदा रिंगणात; 'मविआ' अजूनही शोधतंय पर्याय

एकेकाळी हा मतदारसंघ १९८९ पर्यंत कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर मात्र एकदा माकप व त्यानंतर कधी भाजप तर कधी कॉँग्रेस असा सत्ताबदल होत गेला.

सकाळ वृत्तसेवा

Vardha Lok Sabha 2024 : वर्धा मतदारसंघात गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजप निवडून आला आहे. कधी काळी काँग्रेसचा गड असलेल्या या जिल्ह्यात काँग्रेस आज नावाला उरली आहे. या निवडणुकीत भाजपने पुन्हा खासदार रामदास तडस यांनाच सलग तिसऱ्यांदा रिंगणात उतरविले आहे. एकेकाळी हा मतदारसंघ १९८९ पर्यंत कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर मात्र एकदा माकप व त्यानंतर कधी भाजप तर कधी कॉँग्रेस असा सत्ताबदल होत गेला. आता गेल्या दोन निवडणुकीपासून भाजपने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. महाविकास आघाडी इथे नव्या उमेदवाराच्या शोधात आहे.

२०१९ चे चित्र

रामदास तडस (भाजप) विजयी मते : ५,७८,३६४

चारूलता टोकस (काँग्रेस) मते : ३,९१,१७१

धनराज वंजारी (वंचित बहुजन आघाडी) मते : ३६,४५२

शैलेश अग्रवाल (बसप) मते : ३६,४२३

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १,८७,१९३

वर्चस्व

२००४ : भाजप

२००९ : काँग्रेस

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

  • वर्धा मतदारसंघात नेहमीच तेलीविरुद्ध कुणबी असे समीकरण राहिले आहे.

  • या मतदारसंघात माळी समाजाचीही संख्या लक्षणीय आहे.

  • मुस्लीम आणि दलित मतदान हे काँग्रेसकडे वळत असल्याचा इतिहास आहे.

  • बसपचा केडर या मतदारसंघात असून तो कोणाकडे वळतो, यावर लक्ष ठेवावे लागेल.

  • नवीन मतदारांचा कौल निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल.

हे मुद्दे प्रभावी ठरणार

  • मतदारसंघात रोजगाराचा अभाव

  • शेती प्रक्रिया नसलेले उद्योग

  • एकही मोठा उद्योग नाही

  • जिल्ह्यात झालेला रस्ते विकास

  • सेवाग्राम विकास आराखडा

  • वर्धा, सिंदी, पुलगाव, धामणगाव येथील रखडलेले रेेल्वे उड्डाणपुल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT