Satara Lok Sabha Shashikant Shinde VS Udayanraje Bhosale esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

उदयनराजे, शिंदेंसह १६ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात सीलबंद होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पहिल्यापासून खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत असलेली नाराजी भरून काढण्यासाठी या मतदारसंघात महायुतीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली आहे.

सातारा : सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) व महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत असून, यासह विविध १६ उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांसाठी आज (मंगळवार) सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदारसंघातील २ हजार ३१५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. अटीतटीच्या आणि संघर्षपूर्ण असलेल्या या लढतीत कोणत्या मतदारसंघातून सर्वाधिक मतदान होणार याची उत्सुकता आहे.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, उदयनराजे, शिंदेंसह १६ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात सीलबंद होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या आणि छत्रपतींचे वंशज विरुद्ध सर्वसामान्य उमेदवार अशी प्रतिष्ठेची लढत होत आहे. ही लढत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदेंमध्ये होत असली, तरी प्रत्यक्षात हा सामना पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध खासदार शरद पवार असा रंगला आहे.

पहिल्यापासून खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत असलेली नाराजी भरून काढण्यासाठी या मतदारसंघात महायुतीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली आहे. उदयनराजेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी खासदार शरद पवार एकटेच खिंड लढवत आहेत. त्यांच्यासोबत आपचे माजी खासदार राजेंद्र सिंह, जयंत पाटील, अमोल कोल्हे, सुषमा अंधारे या स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वातावरण चांगलेच गरम झालेले आहे.

आता मतदार कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मते टाकणार याची उत्सुकता आहे. त्यासाठी उद्या (मंगळवारी) सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतील २ हजार ३१५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात ज्या ठिकाणी मतदान झाले तेथे मतदानाची टक्केवारी कमी असल्याने तिसऱ्या टप्प्यात सातारा लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत, तसेच दोन्ही प्रमुख उमेदवारांसह इतर उमेदवारांनीही आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोचून त्यांना मतदानासाठी जास्तीतजास्त संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन केलेले आहे. त्यामुळे साताऱ्यात होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढतीत कोणाच्या पारड्यात किती मतदान पडणार हे उद्या ठरणार आहे. मतदारांनी दिलेला कौल मतदान यंत्रात बंद होणार आहे.

बहिष्‍कार रोखण्‍यात यश

विविध मागण्‍या, प्रश्‍‍नांकडे लक्ष वेधण्‍यासाठी दर वेळी निवडणुकीदरम्यान मतदानावर बहिष्‍काराचा निर्णय काही ठिकाणी जाहीर होतो. यंदाही अशा प्रकारे जिल्‍ह्यात चार ठिकाणी तसा निर्णय घेण्‍याच्‍या मानसिकतेत ग्रामस्‍थ आले होते. त्‍यांना त्‍यापासून परावृत्त करत त्‍यांच्‍या मागण्‍यांवर तोडगा काढण्‍यासाठीच्‍या सकारात्‍मक सूचना केल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

युवा मतदारांवर लक्ष

युवा मतदारांनी शंभर टक्के मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, यासाठी ते शिकत असणाऱ्या महाविद्यालयांची देखील मदत घेण्‍यात आली आहे. युवकांना त्‍यासाठी प्रबोधित करण्‍यात आले असून, त्‍यांनी मतदान केल्याच्‍या आढावाही त्‍या महाविद्यालयांच्‍या मार्फतीने घेण्‍यात येणार आहे.

सुमारे दोन कोटींची मालमत्ता जप्‍त

मतदारांना प्रलोभन दाखवण्‍यासाठी वापरण्‍यात येणाऱ्या वस्‍तू, तसेच इतर साहित्‍यांची वाहतूक रोखण्‍यासाठी जिल्ह्याच्‍या प्रमुख मार्गांवर तपासणी नाके उभारण्‍यात आले होते. या तपासणी नाक्‍यांवर कार्यरत असणाऱ्या पथकांनी तपासणीदरम्‍यान रोकड, नशेचे पदार्थ, गुटखा व इतर साहित्‍य, तसेच वाहने असा सुमारे १ कोटी ९० लाखांचे साहित्‍य जप्‍त केले.

मतदानासाठी यापैकी एक कागदपत्र आवश्यक

मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, केंद्र व राज्य सरकारकडून, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांकडून दिलेली छायाचित्रासह ओळखपत्रे, बॅंक किंवा टपाल विभागाकडील छायाचित्रासह असलेले पासबुक, पॅन कार्ड, जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत रोजगार ओळखपत्र, निवृत्ती वेतनाचे दस्तऐवज, दिव्यांग व्यक्ती मिळालेले विशेष ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषद सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, आरोग्य विमा, स्मार्ट कार्ड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT