amit malviya 
लोकसभा २०२४

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

याप्रकरणी आता राजकारण तापायला लागलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेला पीएचडीचा स्कॉलर रोहित वेमुला हा दलित नसल्याचं सांगत या मृत्यू प्रकरणाची केस तेलंगाणा पोलिसांनी बंद केली आहे. यानंतर आता राजकारण तापायला लागलं आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यावरुन थेट राहुल गांधींना निशाणा बनवलं आहे. आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Will Rahul apologise to Dalits asks Malviya after Telangana police files closure in Rohith Vemula death case)

ट्विट केला राहुल गांधीचा व्हिडिओ

मालवीय यांनी ट्विटरवर हा प्रश्न विचारताना राहुल गांधींनी विनाकारण रोहित वेमुलाचा प्रश्न संसदेत उपस्थित केल्याचं सांगत याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर गप्प का आहेत? असा सवाल विचारला आहे. यावरुन राहुल गांधींनी या प्रकरणावरुन राजकारण केल्याचा आरोपही मालवीय यांनी केला. (Latest Marathi News)

राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?

राहुल गांधींनी रोहित वेमुला प्रकरणावरुन घाणेरडं राजकारण करण्यासाठी संसदेचा वापर केला. कारण आता तेलंगणातील काँग्रेसचं सरकार असलेल्या पोलिसांनी याप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर करताना त्यात रोहित वेमुला दलित नसल्याचं सांगत त्याचा मृत्यू आत्महत्या केल्यानं झाल्याचं म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

त्यामुळं आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का? काँग्रेस आणि कथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी वारंवार दलितांचा वापर राजकारणासाठी केला पण त्यांना न्याय देण्यात ते कायम अपयशी ठरले आहेत, त्याचा हा आणखी एक पुरावा आहे, अशा शब्दांत मालवीय यांनी राहुल गांधींवर थेट हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसनं पसरवलं खोटं नरेटिव्ह

त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते अजय अलोक यांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधताना वेमुला प्रकरणावरुन काँग्रेसनं खोटं नरेटिव्ह पसरवलं असा आरोप केला आहे. तसेच प्रश्न हा नाहीच आहे की रोहित वेमुला हा दलित होता की नाही? तर भाजप दलित विरोधी आहे असं सांगत कोणी संसदेचं कामकाज चालू दिलं नाही? हा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Latest Maharashtra News)

काय आहे प्रकरण?

रोहित वेमुला हा हैदराबाद सेन्ट्रल विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर होता. त्यानं १७ जानेवारी २०१६ रोजी आपल्या हॉस्टेल रुममधील सिलिंग फॅनला गळफास घेतला होता. विद्यापीठानं त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केल्यानं तो निराश झाला होता, त्यानंतर त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawade: हाॅटेल मध्ये 5 कोटी वाटल्याचा बविआचा आरोप, विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

Vinod Tawde : 'भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव; गृहखात्याकडून तावडेंवर पाळत' राऊतांचा इशारा कोणाकडे?

IND vs AUS: अश्विनकडून शिकायला मिळते...! कसोटी मलिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाकडून कौतुकाचा वर्षाव

Pune drink and drive: दारूच्या नशेत स्कॉर्पिओने रिक्षाचालकाला उडवले, अल्पवयीन तरुणाचा प्रताप, पुण्यात कार प्रकरणाची पुनरावृत्ती

कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? सत्ता स्थापनेपासूनच 'ऑपरेशन कमळ'चे प्रयत्न, आमदारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT