Ramesh Jadhav Kalyan Loksabha 
लोकसभा २०२४

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आता नक्की कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो? याकडं सर्वांचं लक्ष आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून यापूर्वीच वैशाली दरेकर यांना उमेदारी जाहीर झाली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला. पण आता ठाकरे गटाचे नेते माजी महापौर रमेश जाधव यांनीही अर्ज भरल्यानं या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. त्यामुळं ठाकरेंकडून उमेदवार बदलणार असल्याची चर्चाही सुरु झाली आहे. (will Uddhav Thackeray change his candidate from Kalyan because Ramesh Jadhav file new application)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील केडीएमसीचे माजी महापौर रमेश जाधव यांनी शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, अंतिम टप्प्यात जाधव यांनी आपला अर्ज दाखल केला. दरम्यान, पक्षाकडून जाधव यांना देखील उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्यानं ठाकरे गटाचा कौल नेमका कोणाकडे आहे? याची चर्चा आता रंगली आहे. (Latest Maharashtra News)

सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आता नक्की कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो? तसेच पक्ष दोघांपैकी कोणाला उमेदवारी जाहीर करतात हे पहावं लागणार आहे. पण वैशाली दरेकर या अर्ज मागे घेतील अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

नाराजीचा फटका नको म्हणून खबरदारी

महायुतीचा उमेदवार ठरण्याअगोदरच महाविकास आघाडीनं आपला उमेदवार जाहीर करत वैशाली दरेकर यांचं नाव जाहीर केलं होतं. दरेकर यांना उमेदवारी दिल्यानं मविआतील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात काहीशी नाराजी आहे. त्यातच ठाकरे गटाचे डोंबिवलीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळं ही नाराजी उघड उघड दिसून आली. (Marathi Tajya Batmya)

विधानसभेचं गणित

माझे महापौर जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरण्यामागं विधानसभेचं गणित असल्याचं देखील बोललं जात आहे. ऐनवेळेला राजकीय समीकरणं फिरून पुढे अडचण होऊ नये म्हणून जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

दरेकर, जाधव यांचं म्हणणं काय?

दरम्यान, रमेश जाधव यांनी सांगितलं की, "उद्धव ठाकरे यांनी सकाळी फोनवर संपर्क साधून आम्हाला उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलं. त्यानुसार शिवसेना पक्ष मशाल यावर आपण उमेदवारी अर्ज भरला आहे. दोन्ही उमेदवारांवर पक्षाचा विश्वास असून यातून एक उमेदवार निवडला जाईल. उमेदवाराच्या अर्जात एखादी त्रुटी राहिल्यास कोणती अडचण येऊ नये म्हणून हा फॉर्म आम्ही भरला आहे.

तर वैशाली दरेकर यांनी यावर भाष्य करताना म्हटलं की, "पक्ष त्यांचे उमेदवार ठरवत असतात. पक्ष आदेश देऊ शकतो, त्याप्रमाणं त्यांनी फॉर्म भरला. पक्षाचा आदेश हेच आमचं काम आहे. तसेच तुम्ही फॉर्म भरून ठेवा असा आदेश पक्ष देऊ शकतो, ही पद्धत आहे. दोन फॉर्म भरून ठेवले जातात. त्याप्रमाणं पक्षानं हा आदेश दिलेला आहे. जर यात काही वेगळंच कारण असतं तर भव्य रॅली काढत माझा उमेदवारी अर्ज भरला नसता. पक्षाच्या काही रणनिती असतात, सर्वच उघड करता येत नाहीत. त्यांनी फॉर्म भरला यात काही वावग नाही. उमेदवार चेंज होणार नाही, जस्ट वेट अँड वॉच"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT