Loksabha Election 2024 
लोकसभा २०२४

Women Agitation on Voting Date: मतदानाच्या दिवशीच महिलांचं धरणं आंदोलन; व्यक्त केला संताप, मतदानावर बहिष्कार

Amit Ujagare (अमित उजागरे)

पश्चिम बंगाल : देशभरात आज ९३ मतदारसंघात मतदान सुरु आहे. पण अनेक मतदारसंघात मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचं चित्र दिसतं आहे. पश्चिम बंगालमधील मलादा जिल्ह्यातील एका गावात तर महिलांनी चक्क धरणं आंदोलन केलं. याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Women agitation on the day of voting in west bengal malda district boycotted voting)

पश्चिम बंगालमध्ये आज तिसऱ्या टप्पातील मतदान होत आहे. मालदा इथल्या राजडौल गावात विकासाची काम झालेली नाहीत. त्यामुळं इथल्या जनतेनं मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये गावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

इथल्या महिला आजच मतदानाच्या दिवशी धरणे आंदोलनावर बसल्या असून आमच्या भागात विकासाची काम झालेली नाहीत असा आरोप करताना रस्ते आणि पुलांची काम झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवडणूक झाल्यानंतर आमचे खासदार आणि आमदार गावात फिरकलेले सुद्धा नाहीत. त्यामुळं सरकारनं आमचं गाऱ्हाणं ऐकायला हवं. (Marathi Tajya Batmya)

त्यामुळं आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला असून जोपर्यंत मतदान सुरु राहणार आहे तोपर्यंत आम्ही धरणं आंदोलन करणार आहोत, अशी भूमिका या महिलांनी घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT