Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024 Bhavana Gawali Rajshree Patil  sakal
लोकसभा २०२४

Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशिममधून भावना गवळींचा पत्ता कट...हेमंत पाटलांच्या पत्नीला मिळालं तिकीट

Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात भावना गवळी यांना मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवार बदलला असल्यामुळे भावना गवळी बंड करणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Sandip Kapde

Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एक दिवस बाकी असताना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भावना गवळी बंड करणार?

एकनाथ शिंदे यांनी तिकीट न दिल्यामुळे भावना गवळी यांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. भावना गवळी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसल्या होत्या. मात्र त्यांना यश आलं नाही. भाजपच्या सर्व्हेमुळे एकनाथ शिंदेंना उमेदवार बदलावे लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजश्री पाटील कोण आहेत?

राजश्री पाटील मूळच्या यवतमाळच्या आहेत. त्या सध्या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष आहेत.हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. नांदेड जिल्हा परिषदमध्ये वाडी गटातून शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये नांदेड दक्षिण विधानसभेसाठी शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. पण त्यांचा पराभव झाला होता.  

नांदेड, हिंगोली, यवतमाळ-वाशिममध्ये त्यांनी प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम केल आहे. राजश्री पाटील आता महायुतीच्या उमेदवार असणार आहेत. (Latest Loksabh Update)

ठाकरे गटाने यवतमाळ-वाशीममधून संजय देशमुख यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख, अशी लढत होणार आहे. हिंगोली, यवतमाळचा अर्ज भरायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जाणार आहेत. हिंगोलीत सकाळी ११ वाजता कोहळीकर अर्ज भरणार तर यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील दुपारी १ वाजता अर्ज भरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT