Loksabha Election 2024  sakal
Loksabha 2019

Loksabha Election 2024 : स्थानिक प्रश्‍नांवरच प्रचाराचा भर

कृष्ण जोशी - सकाळ वृत्तसेवा

उत्तर मुंबईत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची उमेदवारी भाजपने फार पूर्वी जाहीर केली. त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्या तुलनेत काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाल्याने ते काहीसे मागे पडले आहेत. या लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही उमेदवार नवीन आहेत. भाजपच्या प्रचाराच्या एक-दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून काँग्रेसचा प्रचार आता सुरू झाला आहे. पियुष गोयल हे मतदारसंघाबाहेरचे उमेदवार आहेत, तर भूषण पाटील हे स्थानिक आहेत. त्यामुळे स्थानिक विरुद्ध बाहेरचा म्हणूनही या लढतीकडे पाहिले जात आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघात सहापैकी चार आमदार भाजपचे आहेत. तसेच प्रकाश सुर्वे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदारही आहे. मालाडचे अस्लम शेख हे काँग्रेसचे एकमेव आमदार असून या विभागात नगरसेवकदेखील भाजप-शिवसेनेचेच जास्त आहेत. त्यामुळे कागदावर भाजप वरचढ दिसत आहे. यासोबतच विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी हे एकदिलाने गोयल यांचे काम करत आहेत.

प्रकाश सुर्वे यांचीही त्यांना चांगली साथ मिळत आहे. राजकारण आणि समाजकारणामुळे भाजपचा प्रभाव असून भाजपचा हा परंपरागत बालेकिल्ला मानला जातो. येथे गुजराती, मारवाडी, जैन, मराठी या मतदारांचे प्राबल्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात झोपडपट्ट्यांत मराठी आणि उत्तर भारतीय, दाक्षिणात्य मतदार आहेत. यातील उत्तर भारतीय मतदार पूर्वी काँग्रेसची मतपेढी होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रभावामुळे हे मतदार भाजपकडे वळले आहेत. काँग्रेसच्या उत्तर भारतीय नेत्यांनी भाजपचा हात पकडल्यामुळे पक्षाची स्थिती आणखी बळकट झाली आहे. गुजराती, मारवाडी, जैन मतदारांची पहिल्यापासूनच मोदी-शहा यांना साथ मिळाली आहे. मालवणीतील मुस्लिम मते काँग्रेसच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांची युती असल्याने शिवसेनेचे मराठी मतदार तसेच काँग्रेसचे मुस्लिम व दलित मतदार हे समीकरण काही ठिकाणी भाजपला घातक ठरण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडीधारकांचे पुनर्वसन‍, आदिवासी पाड्यांचे प्रश्‍न, मच्छीमारांचे प्रश्‍न हे प्रमुख मुद्दे आहेत.

स्थानिक प्रश्‍न अन्‌ देशाची प्रगती!

भाजपचे उमेदवार पियुष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाचा प्रचार करून लोकांकडे मते मागत आहेत. उत्तर मुंबईची उत्तम मुंबई करू, असे आश्वासन गोयल मतदारांना देत आहेत. भूषण पाटील हे स्थानिक उमेदवार असल्याने तेथील प्रश्‍नांना हात घालून मते मागत आहेत. त्यांनी आपल्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि अन्य तमीळ नेत्यांना प्रचारासाठी बोलावून लढतीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रमुख मुद्दे

  • मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतूचे काम

  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडीधारकांचे पुनर्वसन‍

  • आदिवासी पाड्यांचे प्रश्‍न, मढ-मार्वे परिसरातील मच्छीमारांच्या समस्या

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर भारताची उंचावलेली प्रतिष्ठा

उत्तर मुंबई निवडणूक निकाल २०१९

गोपाळ शेट्टी (भाजप) : ७,०६,६७८

ऊर्मिला मातोंडकर (काँग्रेस) : २,४१,४३१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT