mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! पैसे न मिळालेल्या 1 कोटी लाडक्या बहिणींना ‘या’ तारखेला मिळणार प्रत्येकी 3000 रुपये; सोलापूर जिल्ह्यातील सव्वाचार लाख महिलांचाही समावेश

तात्या लांडगे

सोलापूर : आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील नऊ लाख १९ हजार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी जवळपास चार लाख ८६ हजार महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रूपये जमा झाले आहेत. उर्वरित चार लाख ३४ हजार महिलांच्या खात्यात ३१ ऑगस्ट रोजी पैसे जमा होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील जवळपास एक कोटी महिलांना त्या दिवशी प्रत्येकी तीन हजार रूपये मिळणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुरवातीला ‘नारीशक्ती दूत’ ॲपवरून सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख १४ हजार ६७६ महिलांनी अर्ज भरले होते. त्यानंतर ते ॲप बंद करून शासनाने सुरू केलेल्या पोर्टलवरून तीन लाख चार हजार ६७० महिलांनी अर्ज केले आहेत. अजूनपर्यंत सव्वाचार लाखांहून अधिक महिलांना पैसे मिळालेले नाहीत.

योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असून आता नव्याने प्राप्त झालेल्या ३० हजार अर्जांची पडताळणी सुरू आहे. उर्वरित सर्वच अर्जांना मंजुरी देण्यात आली असून ते अर्ज शासनाला सादर करण्यात आले आहेत. त्यांना आता प्रत्येकी तीन हजार रूपये मिळणार आहेत. तत्पूर्वी, यापूर्वी जिल्ह्यातील एक लाख २९ हजार महिलांच्या बॅंक खात्याला आधार लिंक नसल्याने त्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यांनी तातडीने आधारलिंक करून घ्यावे, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले आहे. दरम्यान, यापुढे आता तीन हजार रूपये जमा झालेल्या लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यात दरमहा दीड हजार रुपयांप्रमाणे रक्कम जमा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तारीख फिक्स नाही
नागपूर येथे ३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वनचपूर्तीचा महामेळावा होणार आहे. त्यानंतर १ किंवा २ सप्टेंबर रोजी त्यांच्याच उपस्थितीत सोलापुरात मेळावा होणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून लाडक्या बहिणींना एसटीतून आणले जाणार असून त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ४०० बसगाड्या घेतल्या जाणार आहेत. पण, कार्यक्रमाची तारीख निश्चित नसल्याने महामंडळाकडूनही गाड्यांचे नियोजन अजून झालेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: बंदी असूनही जड वाहने रस्त्यावर, वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण

28 Four, 18 Sixes! झिम्बाब्वेने T20 मध्ये ठोकल्या तब्बल २८६ धावा! भारताचा विक्रम थोडक्यात वाचला

Akhilesh Yadav : भाजपकडून माणसे तोडण्याचे काम : खासदार अखिलेश यादव

Winter Health Care: हिवाळ्यात दिवसभर उत्साही अन् हायड्रेट राहायचंय? मग स्वत:ची 'अशी' घ्या काळजी

Latest Maharashtra News Updates LIVE : निलेश राणे वर्षा बंगल्यावर दाखल

SCROLL FOR NEXT