सोलापूर : सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डफरीन चौक परिसरात दोघांकडील चार लाख ६९ हजार २०० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. तर फौजदार चावडी पोलिसांनी पाच लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. चौकशी करून ही रोकड पोलिसांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी दहा ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. याशिवाय २१ भरारी पथके देखील आहेत. शहरातून संशयितरित्या फिरणाऱ्या वाहनांसह व्यक्तींवर या पथकांची नजर आहे. पोलिसांनी खबऱ्यांनाही कामाला लावले आहे. मंगळवारी (ता. ५) फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सेवासदन शाळेजवळ दुचाकीवरून पाच लाख रुपयांची रोकड घेऊन जात असताना एकाला पकडले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली जप्त केलेली ती रोकड भरारी पथकाच्या ताब्यात दिली आहे.
दुसरीकडे सदर बझार पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने देखील डफरीन चौक परिसरात दोन ठिकाणाहून जवळपास साडेचार लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. डफरीन चौक पसिरातून सदर बझार पोलिसांनी एका ठिकाणाहून तीन लाख आठ हजार ४०० आणि दुसऱ्या ठिकाणाहून एक लाख ६० हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. ती रोकड भरारी पथकाच्या स्वाधिन करण्यात आली आहे.
रोकड घेवून दोघेजण पायी तर एकजण दुचाकीवर
सदर बझार पोलिसांनी डफरीन चौक परिसरातून दोन वेगवेगळी रोकड जप्त केली आहे. निवडणूक काळात ५० हजारांहून अधिक रोकड जवळ बाळगता येत नाही, त्याहून अधिक रक्कम असल्यास त्याचा हिशेब द्यावा लागतो. सदर बझार पोलिसांनी पकडलेल्या दोन व्यक्ती विशेष म्हणजे तेवढी रोकडे घेऊन पायी जात होत्या. पोलिस त्यांच्याकडे रोकडसंबंधी कसून चौकशी करत आहेत. तर फौजदार चावडी पोलिसांनी सेवासदन शाळेजवळ पकडलेली रोकड एक दुचाकीस्वार दुचाकीवरून घेऊन जात होता हेही विशेष. त्याचीही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.