maharashtra ssc board exam SAKAL
महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो नक्की वाचा! 'प्रात्यक्षिक'वर बोर्डाच्या पथकांचा वॉच; परीक्षा केंद्रांवर आता सरमिसळ विद्यार्थी

परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना ६ नोव्हेंबर, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. आता प्रात्यक्षिक परीक्षेच्या पडताळणीसाठी बोर्डाकडून प्रत्येक जिल्ह्यात पथके पाठविली जाणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षेला सुरवात होणार असून तत्पूर्वी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ६ नोव्हेंबर, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. दरम्यान, आता बोर्डाने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या अंमलबजावणीत थोडासा बदल केला असून प्रात्यक्षिक परीक्षेच्या पडताळणीसाठी बोर्डाकडून प्रत्येक जिल्ह्यात पथके पाठविली जाणार आहेत.

दरवर्षी इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा सुरु असताना पेपर सुरु होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचायला दिली जाते. पण, मागच्या वर्षी हा प्रकार बंद करून कॉपी प्रकरणाला आळा घालण्याचा प्रयत्न बोर्डाकडून झाला.

यंदाही तो बदल कायम राहणार आहे. दुसरीकडे आता एकाच शहरात एकापेक्षा जास्त परीक्षा केंद्रे असतील तर एका केंद्रांवरील मुले दुसऱ्या केंद्रांवर परीक्षा देतील, असाही बदल (बार्शी शहरात सहा केंद्रे आहेत, त्या केंद्रांवरील विद्यार्थी सरमिसळ करून सर्वच केंद्रांवर बसविले जातील.) या वर्षीपासून केला जाणार आहे. ज्याठिकाणी एकच परीक्षा केंद्र आहे, त्याठिकाणी असा बदल नसणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती किंवा इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे हा बदल असणार आहे. एका दिवशी जिल्ह्यात आलेली बोर्डाची पथके त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील बहुतेक शाळांना भेटी देतील. गुणदानातील बनावटगिरी रोखण्यासाठी बोर्डाकडून असा नवीन निर्णय घेण्यात आला आहे.

पुस्तकी प्रात्यक्षिकाला आता पायबंद

अनेक दहावी- बारावीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकच होत नाही. प्रात्यक्षिक न घेताच विद्यार्थ्यांना गुण दिले जातात, अशा तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता बोर्डाचे प्रात्यक्षिक सुरु होईल, त्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेतले जाते का, प्रयोग होतात का, याची पडताळणी बोर्डाच्या पथकांकडून होणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी पथके नेमले जाणार आहे.

‘प्रात्यक्षिक’ची पडताळणी करणार बोर्डाची पथके

कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग बंद पडू नयेत म्हणून अनेक शाळा गैरहजर विद्यार्थ्यांची हजेरी दर्शवून त्यांनाही प्रात्यक्षिकचे गुण देतात. आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा आणि पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांनी आपल्याकडेच प्रवेश घ्यावे म्हणून हा प्रकार सुरु असल्याच्या तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षेवेळी विशेष पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

- औदुंबर उकिरडे, सचिव, पुणे बोर्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयी उमेदवाराचे औक्षण करताना रसायनयुक्त गुलालामुळे उडाला भडका; सहा ते सात कार्यकर्ते भाजले, नेमकं काय घडलं?

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : राज्याचा निकाल आधीच ठरला होता, नंतर निकालाचं चित्र बदललं; महायुतीच्या विजयानंतर संजय राऊतांचा आरोप

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध ए आर रहमानने जारी केली कायदेशीर नोटीस ; "या अफवेमुळे माझ्या कुटूंबाला त्रास..."

SCROLL FOR NEXT