Supreme court on 10th 12th Board Exam sakal
महाराष्ट्र बातम्या

दहावीची १ मार्चपासून परीक्षा! पाणी वाटपासाठी कर्मचारी नसतील; अर्धा तास अगोदर केंद्रावर जा, १० मिनिटे उशिर झाल्यास परीक्षेला मुकावे लागणार

सध्या इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असून आता १ मार्चपासून दहावीच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा सुरू होईल. या विद्यार्थ्यांसाठी पण सरमिसळ पद्धत असणार आहे. यंदा परीक्षार्थींना पाणीवाटप करणारे कर्मचारी नसणार आहेत. पाणी वाटपाची जबाबदारी पर्यवेक्षकाचीच असणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सध्या इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असून आता १ मार्चपासून दहावीच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा सुरू होईल. जिल्ह्यातील ६५ हजार ७४९ विद्यार्थी १८२ केंद्रांवर परीक्षा देतील. या विद्यार्थ्यांसाठी पण सरमिसळ पद्धत (एकाच शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रांवर) असणार आहे. यंदा परीक्षार्थींना पाणीवाटप करणारे कर्मचारी नसणार आहेत. पाणी वाटपाची संपूर्ण जबाबदारी त्या वर्गावरील पर्यवेक्षकाचीच असणार आहे.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ ते २६ मार्चपर्यंत परीक्षा चालणार आहे. या परीक्षेवरही प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षणाधिकारी यांची भरारी पथके वॉच ठेवणार आहेत. जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या १४ संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. दुसरीकडे एका महिला कर्मचाऱ्यासह तिघांचे बैठे पथक देखील त्याठिकाणी तीन तास (पेपर संपेपर्यंत) बसून राहणार आहे. दरम्यान, पाणीवाटप करणाऱ्यांवर बोर्डाने यंदा निर्बंध घातले असून पाणीवाटप करणाऱ्यांकडून अनेकांना कॉपी पुरविल्या जातात, अशा तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार बोर्डाने आता पर्यवेक्षकाच्या परवानगीशिवाय वर्गात कोणालाही प्रवेश देवू नये असाही बोर्डाचा आदेश आहे.

भरारी पथकांसह कोणालाही त्यांच्याकडील ओळखपत्र पाहिल्याशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नसणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गात सोडताना त्यांची अंगझडती घेऊनच आत सोडले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहावे, पेपर सुरू होऊन दहा मिनिटांनी आल्यास त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

१ मार्चपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा

बोर्डाच्या नवीन सूचनांनुसार यंदा परीक्षेत विद्यार्थ्यांना पाणी वाटप करणारे नसणार आहेत. १ मार्चपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होईल. १४ संवेदनशील केंद्रांसह इतर १८२ केंद्रांवर बैठे पथकांसह पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

- मारुती फडके, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

कॉपी सापडल्यास तीन वर्षांपर्यंत परीक्षेला बंदी

बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी ४६ भरारी पथके (महसूल व जिल्हा परिषदेची) नेमली असून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देखील काही केंद्रांना अचानक भेटी देतील. बैठे पथकांनाही सक्त सूचना असून कॉपी सापडलेल्या वर्गावरील पर्यवेक्षकावर देखील कारवाई होणार आहे. दरम्यान, कॉपी करताना एखादा विद्यार्थी सापडल्यास त्याला किमान एक ते तीन वर्षांपर्यंत पुन्हा परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे कोणीही कॉपी न करता प्रामाणिकपणे वर्षभर केलेल्या अभ्यासावर परीक्षा द्यावी, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT