नवी मुंबईच्या खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक एकत्र आले होते. मात्र उष्माघातामुळे 11 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. दरम्यान नागपूरमधील महाविकास आघाडीची सभा आटोपून उद्धव ठाकरे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंनी एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यासह अरविंद सावंत आणि विनायक राऊत हे देखील एमजीएम रुग्णालयात पोहोचले. इथे त्यांनी आजारी असलेल्यांची विचारपूस केली. श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. परंतु या कार्यक्रमानंतर जमलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कार्यक्रमादरम्यान जवळपास सव्वाशेच्या आसपास लोकांनी डिहायड्रेशन होत असल्याची तक्रार केली. त्यांना तातडीने घटनास्थळी असलेल्या मेडिकल बूथमध्ये नेण्यात आले. 13 रुग्णांना विशेष उपचारांची आवश्यकता होती, त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. यामध्ये अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
भर दुपारी कार्यक्रम ठेवणं ही आयोजकांची चूक
'अमित शाहांना लवकर निघायचं होतं म्हणून कार्यक्रम भर दुपारी ठेवला का'?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. तर मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. उन्हाळा असताना भर दुपारी कार्यक्रम ठेवणं ही आयोजकांची चूक आहे. तसेच रुग्णांची आणि मृतांची संख्या उघड झाली नसल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत.
मृतांची नावे
1. तुळशीराम भाऊ वागडे, (वय 58 वर्षे, रा. जांभूळ विहीर ता जव्हार)
2. जयश्री जगन्नाथ पाटील, (वय 54 वर्षे, रा वारळ पो मोदडी ता म्हसळा)
3. महेश नारायण गायकर, (वय 42 वर्षे, रा. मेदडू ता म्हसळा)
4. मंजुषा कृष्णा भोगडे, (रा. भुलेश्वर मुंबई, मूळगाव श्रीवर्धन)
5. भीमा कृष्णा साळवे, (वय 58 वर्षे, रा. कळवा ठाणे)
6. सविता संजय पवार, वय 42 वर्षे, रा. मंगळवेढा सोलापूर)
7. स्वप्नील सदाशिव किणी, (वय 32 वर्षे, रा. विरार)
8. पुष्पां मदन गायकर (वय 63 वर्षे, रा. कळवा ठाणे)
9. वंदना जगन्नाथ पाटील (वय 62 वर्षे, रा. माडप ता खालापूर)
10. कलावती सिद्धराम वायचल (रा. सोलापूर)
11 महिलेची ओळख पटलेली नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.