e auction esakal
महाराष्ट्र बातम्या

E-Auction : ११६ बाजार समित्या केंद्राच्या ‘ई-नाम’शी जोडल्याने शेतमालाच्या आंतरराज्य ई-लिलावाला सुरवात

राज्यातील ११८ कृषी उत्पन्न बाजार समित्या केंद्र सरकारच्या ‘ई-नाम’ या योजनेअंतर्गत देशातील अन्य बाजार समित्यांशी जोडल्या गेल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील ११८ कृषी उत्पन्न बाजार समित्या केंद्र सरकारच्या ‘ई-नाम’ या योजनेअंतर्गत देशातील अन्य बाजार समित्यांशी जोडल्या गेल्या आहेत.

पुणे - राज्यातील ११८ कृषी उत्पन्न बाजार समित्या केंद्र सरकारच्या ‘ई-नाम’ या योजनेअंतर्गत देशातील अन्य बाजार समित्यांशी जोडल्या गेल्या आहेत. यामुळे या बाजार समित्यांना आता बाहेरील राज्यातील बाजार समित्या आणि आंतरमंडीच्या माध्यमातून ई-लिलावात सहभागी होता येणार आहे. राज्यात या उपक्रमाची सुरवात गुरुवारपासून (ता.६) झाली आहे.

देशातील १ हजार २६० बाजार समित्या या उपक्रमांतर्गत जोडल्या गेल्या आहेत. यानुसार या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशीच ‘ई-नाम’अंतर्गत देशातील या सर्व बाजार समित्यांमध्ये १ हजार ९९४ कोटी रुपये किमतीच्या एकूण ५ कोटी १३ लाख क्विंटल शेतमालाची ई-लिलावाद्वारे विक्री झाली आहे. या बाजार समित्यांमध्ये पहिला स्तर पूर्ण झालेला असून आत्तापर्यंत ई-नामद्वारे सोयाबीन, हरभरा, मका, गहू, ज्वारी, हळद, तूर व उडीद या शेतमालाची विक्री करण्यात आली आहे.

दरम्यान, या उपक्रमांतर्गत राज्यातील सिंगल लायसन्सधारकांद्वारे इंटरमंडी व्यवहार सुरु करण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख ६७२ क्विंटल शेतमालाची ई-लिलावाद्वारे खरेदी-विक्री झाली आहे. या खरेदी-विक्री व्यवहारातून एकूण ५४ कोटी ६१ लाख किमतीचे व्यवहार झाले आहेत. यामध्ये तूर, हरभरा, मका व सोयाबीन आदी शेतमालाचा समावेश आहे. राज्यातील विदर्भातील अमरावती ॲग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, दयाल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट लिमिटेड नर्मदा सॉलव्हेक्स प्रायव्हेट लिमिटेड या सिंगल लायसन्सधारकांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील दोन बाजार समित्यांमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये ‘ई-नाम’अंतर्गत प्रथमच दोन राज्यातील बाजार समित्यांमध्ये (इंटरस्टेट) शेतमालाचा ई-लिलावाद्वारे खरेदी-विक्री व्यवहार सुरु करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने नागपूर येथील रेशीम संचालनालयाच्या मान्यतेने मुख्य यार्ड येथे रेशीम कोश खरेदी विक्रीसाठी केंद्र सुरु केले आहे. या केंद्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नगर, बीड, परभणी, यवतमाळ येथून शेतकरी रेशीम कोश विक्रीसाठी आणतात.

रेशीम कोशचा पहिला लिलाव बारामतीत

ई-नामद्वारे आंतरराज्य (इंटरस्टेट) व्यवहारांतर्गतचा रेशीम कोशसाठीचा देशातील पहिला ई-लिलाव बारामती बाजार समितीमध्ये पार पडला. ई-नामद्वारे रेशीम कोशाची केरळ येथील व्यापाऱ्यांकडून मोठी खरेदी केली जात आहे. बारामती बाजार समितीमध्ये रेशीम कोश विक्री केंद्र सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला असल्याचेही दीपक शिंदे यांनी म्हटले आहे.

राज्यातील ‘ई-नाम’ प्रणाली दृष्टीक्षेपात...

- नाशिक जिल्ह्यात कळवण येथील शेतीश्लोक शेतकरी उत्पादक संस्थेद्वारे देवळा या ई-नाम बाजार समितीमधून झारखंडच्या दिल्ली फ्रेश कंपनीला कांद्याची विक्री करण्यात आली.

- खरेदीदार हे ई-नामद्वारे ऑनलाइन रक्कम अदा करत आहेत.

- सद्यःस्थितीत ई-नाम इंटरस्टेटद्वारे रेशीम कोश, कापूस, कांदा, मूग व ओवा या शेतमालाची विक्री सुरु

- केरळ, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान व गुजरात या राज्यातून मोठ्या प्रमाणात खरेदी

- शेतमालाच्या गुणवत्ता तपासणींतर्गत १२ लाख ९७ हजार लॉट्सची तपासणी

- ई-नाम अंतर्गत ३१० कोटी ५९ लाखाची रक्कम आॅनलाइन शेतकऱ्यांच्या खात्यात

- सद्यःस्थितीत ‘ई-नाम’अंतर्गत ई-पेमेंट करणारे महाराष्ट्र हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT