12 MLA Suspended e sakal
महाराष्ट्र बातम्या

...तर १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्यास मोठी अडचण?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक (Maharashtra Assembly Speaker Election) आज घेण्यात येणार होती. मात्र, राज्यपालांनी निवडणुकीच्या बदललेल्या नियमांवर आक्षेप घेतला. त्यानंतर आता निवडणूक होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न झाल्यानं भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन (BJP 12 MLA Suspended) मागे घेण्याची शक्यता कमी असल्याची माहिती आहे.

गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातला आणि अध्यक्षांना धक्काबुक्की केल्यामुळे भाजपच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं. या घटनेचा भाजपने तीव्र निषेध नोंदवला. त्यानंतर १२ आमदार राज्यपालांच्या भेटीला गेले होते. त्यांनी निलंबन मागे घेण्यासाठी राज्यपालांना निवेदन देखील लिहिले होते. तसेच भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. इतकंच नाहीतर बाराही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. तरीही त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं नाही. पण, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाल्यास निलंबन मागे घेण्याची शक्यता होती.

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यावर ठाकरे सरकार ठाम होतं. त्यासाठी त्यांनी निवडणुकीचे नियम देखील बदलले होते. आवाजी पद्धतीनं मतदान घेण्यात येणार होतं. पण, राज्यपालांनी पत्र पाठवून निवडणुकीच्या बदललेल्या नियमांवर आक्षेप घेतला. त्यानतंर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिले होते. राज्यपालांकडून सरकारच्या कायद्यांवर अविश्वास दाखवला, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पत्रात निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रांना उत्तर दिले. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT