rte admission esakal
महाराष्ट्र बातम्या

‘RTE’ प्रवेशाला 15 दिवसांची मुदतवाढ! आतापर्यंत 1.88 लाख अर्ज; एकूण अर्जदारांपैकी 48000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; ‘या’ अर्जांची होणार पडताळणी

आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेशासाठी राज्यातील एक लाख ८८ हजार २०० पालकांनीच ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यामुळे उर्वरित पालकांसाठी आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत आणखी १५ दिवस वाढविली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश करण्याची शेवटची मुदत उद्या (मंगळवारी) संपणार आहे. ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के प्रवेशाप्रमाणे राज्यातील ७५,२६४ शाळांमध्ये नऊ लाख ६४ हजार ३९४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पण, आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेशासाठी राज्यातील एक लाख ८८ हजार २०० पालकांनीच ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यामुळे उर्वरित पालकांसाठी आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत आणखी १५ दिवस वाढविली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

यंदा आरटीई प्रवेशासाठी इयत्ता पहिल्याच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना सर्वप्रथम घराजवळील खासगी अनुदानित शाळेचा पर्याय निवडावा लागणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर खासगी अनुदानित शाळा नसल्यास किंवा खासगी अनुदानित शाळेऐवजी महापालिका, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्याला (घरापासून एक किमी अंतरावरील शाळा) प्रवेश घ्यायचा असल्यास सर्वप्रथम त्याला त्या दोन शाळांचा पर्याय निवडावाच लागणार आहे. जर विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी अंतरावर खासगी अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची शासकीय शाळा नसल्यास त्यांना खासगी इंग्रजी माध्यमाची स्वयं अर्थसहाय्यिता शाळेची निवड करता येणार आहे.

हा बदल अनेक पालकांना पटलेला नाही. त्यामुळे अनेक पालकांनी आरटीई प्रवेशासाठी अर्ज केले, पण त्यांनी अजूनही प्रवेश निश्चित केलेला नाही. दरम्यान, प्रवेशासाठी आता एकदा १५ दिवसांची मुदतवाढ दिली जाणार असून त्यानंतर प्रवेशाची स्थिती पाहून पुन्हा दहा दिवसांची मुदतवाढ मिळू शकते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, मुदतवाढीची अपेक्षा न करता पालकांनी मुदतीत अर्ज करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अर्जदार लाखभर पण ‘इंग्रजी’ नसल्याने निराशा

आरटीई प्रवेशाला सुरवात झाल्यानंतर आपल्या पाल्याला इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश मिळावा म्हणून पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal यावर ऑनलाइन अर्ज करायला सुरवात केली आहे. आतापर्यंत दोन लाखांपर्यंत अर्ज प्राप्त झाले, मात्र, प्रवेश निश्चित करण्याचे प्रमाण एकूण अर्जांच्या ३० टक्क्यांपर्यंतच आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार ३७८ शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्क्याप्रमाणे ४४ हजार ७७ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहेत. पण, आतापर्यंत चार हजार २५ पालकांनी ऑनलाइन अर्ज केले असून त्यापैकी केवळ ८१० पालकांनीच मुलांचा प्रवेश निश्चित केला आहे. उर्वरित तीन हजार २१५ पालकांनी अजूनही शाळा व प्रवेश निश्चित केलेला नाही. अशी वस्तुस्थिती राज्यभर आहे. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय नसल्याने पालकांची निराशा झाल्याची स्थिती आहे.

आरटीई प्रवेशाची सद्य:स्थिती

  • एकूण शाळा

  • ७५,२६४

  • एकूण प्रवेश क्षमता

  • ९,६४,३९४

  • आतापर्यंतचे अर्ज

  • १,८८,२००

  • प्रवेश निश्चिती

  • ४८,०००

‘इंग्रजी’चा पर्याय निवडलेल्यांची पडताळणी

‘आरटीई’च्या निकषात बदल करूनही काही पालकांनी आपल्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय किंवा खासगी अनुदानित शाळा नाही म्हणून इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांचा पर्याय निवडला आहे. आतापर्यंत प्राप्त अर्जात तसे अर्ज किती आहेत, याची जिल्हानिहाय माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून त्या पाल्याच्या घरापासून खरोखरच अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नाहीत का, याची पडताळणी केली जाणार आहे. चुकीची किंवा खोटी माहिती भरलेली असल्यास तो अर्ज बाद ठरविला जावू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT