Rabies vaccination sakal
महाराष्ट्र बातम्या

Rabies Vaccination : १५ हजार भटक्‍या श्‍वानांचे होणार रेबिज लसीकरण

राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण करण्यात येणार.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - 'रेबिजमुक्त मुंबई’ साठी मुंबई महानगरपालिकेने उपक्रम हाती घेतला असून १५ हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात येणार आहे. लसीकरणानंतर प्रायोगिक तत्वावर काही भटक्‍या श्‍वानांच्‍या गळ्यात 'क्‍यूआर कोड' असलेले 'कॉलर' घालण्‍यात येणार आहेत. राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

महानगरपालिका आणि १५ स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या वतीने पालिका क्षेत्रातील ६ प्रशासकीय विभागातील १५ हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात येणार आहे. लसीकरणानंतर प्रायोगिक तत्वावर काही भटक्‍या श्‍वानांच्‍या गळ्यात 'क्‍यूआर कोड' असलेले 'कॉलर' घालण्‍यात येणार आहेत.

क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर श्‍वानाच्‍या माहितीसह त्‍याला खाद्य देणाऱ्याचा (फिडर) तपशील, लसीकरण आणि वैद्यकीय माहिती प्राप्त होण्‍यास मदत मिळणार आहे. हे लसीकरण मोबाईल ॲपआधारित होईल.

आंतरराष्ट्रीय रेबिज दिवसाचे औचित्य साधून पालिकेने ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्‍ट निश्चित करण्‍यात आले आहे. त्‍यासाठी विविध स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई शहर वाहतूक विभाग, बोरिजर इंगलहाईम, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबई या स्वयंसेवी संस्थेसह इतर १५ स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २९ सप्टेंबर २०२३ ते १० ऑक्टोबर २०२३ या १० दिवसांच्या मुंबईतील सुमारे १५ हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण केले जाईल.

यासाठी शंभर कर्मचारी कार्यरत असणार आहेत. केवळ लसीकरणावर न थांबता श्‍वानांच्‍या आरोग्‍यासाठी महानगरपालिका आता अत्‍याधुनिक उपाययोजनादेखील राबविणार आहे.

सन २०१४ मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटके श्‍वान होते. ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या श्‍वानांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देणे गरजेचे असे पालिकेने म्हटले आहे.

मोबाईल ॲपवर भटक्या श्वानांची माहिती

मोबईल ॲपच्या माध्यमातून भटक्या श्वानांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या सहायाने श्‍वानांचे रेबिज लसीकरण तसेच, प्राथमिक आरोग्य तपासणीदेखील करण्यात येणार आहे.

लसीकरण करण्यात आलेल्या श्वानाचा फोटो, लसीकरण करण्यात आलेले ठिकाण आणि त्याच्या आरोग्याची माहिती या मोबाईल ॲपमध्ये एकत्रित करण्यात येणार आहे. यापुढील काळातही ही मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT