zp school sakal
महाराष्ट्र बातम्या

झेडपी शाळांचे 15000 शिक्षक कायमचेच घटणार? 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

२०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील १४,७८३ शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड-बीएडधारक तरुणाची नेमणूक केली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील १४ हजार ७८३ शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक (७० वर्षांची वयोमर्यादा) किंवा डीएड-बीएडधारक तरुणाची नेमणूक केली जाणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तेवढी पदे कायमचीच संपुष्टात येतील, असे बोलले जात आहे.

‘आरटीई’नुसार कमी पटसंख्या असतानाही त्या शाळांमध्ये दोन ते तीन शिक्षक कार्यरत होते. पटसंख्या जास्त असतानाही त्या शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळत नाहीत, अशी दुसरी बाजू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षण विभागाने ‘समूह शाळा’ हा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ‘गाव तेथे शाळा’ ही संकल्पना मोडीत निघेल व त्या गावातील विद्यार्थी शाळा शिकणार नाहीत म्हणून त्याला सर्वच स्तरातून विरोध झाला. त्यामुळे शासनाला तो पॅटर्न गुंडाळून ठेवावा लागला. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये शालेय शिक्षण विभागाने त्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय काढला. आता सेवानिवृत्त शिक्षकाबरोबरच डीएड-बीएड झालेल्या सुशिक्षित तरुणालाही संधी देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र, त्या जागांवर कायमस्वरूपी शिक्षक नेमावेत आणि हा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी होत आहे.

मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कार्यवाही

२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर प्रत्येकी एक डीएड-बीएडधारक कंत्राटी तरुण-तरुणी किंवा सेवानिवृत्त शिक्षक घेण्यासंदर्भात शासन निर्णय झाला आहे. परंतु, सध्या कार्यरत शिक्षकापैकी कोणत्या शिक्षकाला तेथून दुसऱ्या शाळेत पाठवायचे, एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास निवड कोणाची कशापद्धतीने करायची, नियुक्तीचे अधिकार नेमके कोणाला, यासंदर्भात संचालक कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना येतील. त्यानुसार काही दिवसांत कार्यवाही केली जाईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

पटसंख्या वाढवून पद वाचविण्याचे प्रयत्न

मागील काही वर्षांपासून शाळेची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे, अशा शाळांवरील काही शिक्षक आता शेजारील किंवा दुसऱ्या शाळेतून चार-पाच विद्यार्थी आणून पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर ज्या जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळांची पटसंख्या वाढेल?, त्याठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमता येईल का?, या प्रश्नाचे उत्तर खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांकडे देखील नाही.

कमी पटसंख्येच्या शाळांची स्थिती

  • १ ते ५ पटसंख्येच्या शाळा

  • १,७३४

  • ६ ते १० पटसंख्येच्या शाळा

  • ३,१३७

  • ११ ते २० पटसंख्येच्या शाळा

  • ९,९१२

  • कमी पटसंख्येच्या एकूण शाळा

  • १४,७८३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT