Maharashtra Public Service Commission esakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; 161 पदांची होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

कोरोना काळानंतर आयोगानं मोठ्या पदभरतीची घोषणा केल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय.

कोरोना काळानंतर (Coronavirus) आयोगानं मोठ्या पदभरतीची घोषणा केल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 (MPSC Rajya Seva Bharti 2022) मधून भरण्यात येणाऱ्या सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदांच्या एकूण 161 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केलीय. राज्य सेवा आयोगाची 2022 साठीची पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या अंतर्गत एकूण 161 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. राज्यातल्या 37 केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार आहे.

परीक्षेचे नाव – राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022

पदाचे नाव –

  • सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा : एकूण पदे 09

  • मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद : 22 पदे

  • बाल विकास प्रकल्प अधिकारी : 28 पदे

  • सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क : 02 पदे

  • उप अधीक्षक, राज्य उत्पादन शु्ल्क : 03 पदे

  • कक्ष अधिकारी : 05 पदे

  • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी : 04 पदे

  • निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था व अन्य : 88 पदे

  • पद संख्या – 161 जागा

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क

अमागास – 544 रुपये

मागासवर्गीय – 344 रुपये

वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 मे 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT