police vacancy sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! पोलिस भरतीच्या १७,४७१ जागांसाठी १७.७६ लाख अर्जांचा ढीग; जूनपासून मैदानी चाचणी; डीएड, बीएडसह अभियंत्यांचेही अर्ज; कोणत्या पदासाठी किती अर्ज?

सोलापूर : राज्यभरात १७ हजार ४७१ पदांची भरती होत आहे. त्यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केले आहेत. त्यात अभियांत्रिकी झालेल्या तरुण-तरूणींसह डीटीएड, बीएड झालेल्यांसह बहुसंख्य उमेदवार पदवीधर असल्याची वस्तुस्थिती आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यभरात १७ हजार ४७१ पदांची भरती होत आहे. त्यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केले आहेत. त्यात अभियांत्रिकी झालेल्या तरुण- तरूणींसह डीटीएड, बीएड झालेल्यांसह बहुसंख्य उमेदवार पदवीधर असल्याची वस्तुस्थिती आहे.

राज्यातील बेरोजगारीचे दर्शन यापूर्वीच्या शासकीय विभागांच्या भरतीतून समोर आला आहे. जिल्हा परिषद, तलाठी भरतीत देखील जागांच्या तुलनेत दहापट अर्ज आले होते. आता पोलिस बॅण्डसमन या पदभरतीत एका जागेसाठी तब्बल ७८० उमेदवार रिंगणात आहेत. तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेकरिता २०६ तर पोलिस चालक पदासाठी एका जागेसाठी ११७ उमेदवार भरतीच्या मैदानात असणार आहेत. एकूणच या पोलिस भरतीत एका जागेसाठी १०२ उमेदवारांची परीक्षा होईल. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे.

लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच ४ जूननंतर मैदानी चाचणीला सुरवात होईल. उन्हाची तीव्रता पाहून सकाळच्या सत्रातच मैदानी चाचणी होणार आहेत. साधारणत: दिवाळीपूर्वी लेखी परीक्षा होवू शकते. पण, विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे.

लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर- ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता, यावेळी बहुसंख्य पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर असतात. त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येवू शकते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती उरकावी लागणार आहे अशी सद्य: स्थिती आहे.

पदे अन्‌ उमेदवारांचे अर्ज

  • पदनाम रिक्त पदे अर्ज

  • पोलिस शिपाई ९,५९५ ८.२२ लाख

  • चालक १,६८६ १.९८ लाख

  • पोलिस बॅण्डसमन ४१ ३२,०००

  • एसआरपीएफ ४,३४९ ३.५० लाख

  • तुरुंग शिपाई १,८०० ३.७२ लाख

  • एकूण १७,४७१ १७.७६ लाख

लोकसभेच्या आचारसंहितेनंतर भरतीला प्रारंभ

पोलिस भरतीसाठी प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणत: अडीच ते तीन महिने लागू शकतात. उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची स्वतंत्र आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांची एकाचवेळी परीक्षा घ्यायची याचा निर्णय होणार आहे. मागील भरतीवेळी मुंबईची भरती स्वतंत्र झाली होती. यंदा तशाप्रकारेच घ्यायची की संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा घ्यायची याचा निर्णय आचारसंहितेनंतर होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT