solapur rto sakal
महाराष्ट्र बातम्या

ट्रॅव्हल्स चालकांना ‘आरटीओ’च्या १८ सूचना! उल्लंघन केल्यास १०००० दंड, ६ ते २४ महिन्यांचा कारावास, परवाना, परमीट निलंबीत

समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर आरटीओ अधिकारी अलर्ट झाले असून त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर वॉच ठेवायला सुरवात केली आहे. प्रवाशांची सुरक्षितता याला प्राधान्य दिले जात आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर आरटीओ अधिकारी अलर्ट झाले असून त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर वॉच ठेवायला सुरवात केली आहे. प्रवाशांची सुरक्षितता याला प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर आरटीओ अधिकाऱ्यांकडून सावळेश्वर टोल नाका, बार्शी टोल नाका, इंचगाव टोल नाका, नांदणी येथील तपासणी नाका येथे बसगाड्यांची तपासणी सुरु केली आहे. १८ सूचनांचे पालन प्रत्येकासाठी बंधनकारक असून त्याचे उल्लंघन झाल्यास वाहनाचे परमीट, चालकाचे लायसन्स व वाहन जप्त करण्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणाकर, अमरसिंह गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक निरीक्षक पल्लवी पांडव, धनंजय गोसावी, ललित देसले, निरंजन पुनसे, सिद्धाराम पांढरे, महेश रायबान, निलेश बनसोडे, सुहास सुत्रावे, किरण बनसोडे, रहिमा मुल्ला, विवेक भोसले, अनिल वैरागडे, सागर पाटील, पद्माकर विश्वे, प्रदीप वाघ, संदीप पाटील हे अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

दरम्यान, मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५अंतर्गत मद्यपान करून गाडी चालवताना कोणी आढळल्यास जागेवरच दहा हजार रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांच कारावास किंवा दोन्ही शिक्षका एकत्रितपणे भोगाव्या लागू शकतात. त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी दोन वर्षांपर्यंतचा कारावास व १५ हजारांचा दंड आकारला जावू शकतो, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

आरटीओ अर्चना गायकवाड म्हणाल्या...

  • - राज्यात दरवर्षी सरासरी १३ हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात होतोय

  • - दररोज सरासरी ३५ जणांचा मृत्यू जिव्हारी लागणाराच आहे; सर्वांनी पाळावेत वाहतूक नियम

  • - समृद्धी महामार्गावरील अपघाताची पुनरावृत्ती नकोच; सर्वांनी खबरदारी घ्यावी

  • - आदेश व नियमांचे पालन न केल्यास परमीट, लायसन्स आणि वाहन जप्तीची कारवाई होईल

‘या’ १८ सूचनांचे तंतोतंत पालन करा

गाडीत अग्निशमन यंत्रणा असावी, स्पीड गव्हर्नर लावावेत, इंडिकेटर चालू असावेत, लाईट्‌स पूर्णपणे चालू असावी, चालकाचा गणवेश असावा, रात्रीच्यावेळी बॅक लाईट चालू ठेवावी, परावर्तक असावेत, हॉर्न बसवावा, बसमधील प्रवासी क्षमता अतिरिक्त नसावी, वाहनचालकाच्या केबिनमध्ये प्रवासी बसवू नयेत, आपत्तकालीन दरवाजा सुस्थितीत असावा, प्रवासाआधी प्रवाशांना सुरक्षिततेविषयी माहिती द्यावी, वाहन मालकांनी वाहनचालकांची वेळोवेळी नेत्रतपासणी करावी, आरोग्य तपासणी करावी, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, तपासीत तसे आढळून आल्यास कडक कारवाई होईल. तसेच खासगी बसमधून मालवाहतूक नको, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक नको, बसगाड्यांची कागदपत्रे विशेषत: फिटनेस प्रमाणपत्र, विमा अद्ययावत असावा. बसमध्ये कोणतेही अनधिकृत बदल करू नयेत, अशा १८ प्रकारच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी प्रवासी वाहनमालकांसह चालकांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT