sakal breaking sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरातील व्यावसायिकाची अवघ्या २५ दिवसांत १.८० कोटींची फसवणूक! सायबर गुन्हेगारांकडून शेअर मार्केट फंडा; जादा पैसे कमावण्याच्या आमिषतून गंडा

सोलापुरातील एका बड्या व्यावसायिकाला सायबर गुन्हेगारांनी शेअर मार्केटमधून काही दिवसांत दुप्पट परतावा मिळेल, या आमिषतून अवघ्या २५ दिवसांत तब्बल एक कोटी ८० लाख रुपयाला गंडा घातला आहे. सोलापूर शहर सायबर पोलिसांकडे त्यांनी ऑनलाइन तक्रार केली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील एका बड्या व्यावसायिकाला सायबर गुन्हेगारांनी शेअर मार्केटमधून काही दिवसांत दुप्पट परतावा मिळेल, या आमिषतून अवघ्या २५ दिवसांत तब्बल एक कोटी ८० लाख रुपयाला गंडा घातला आहे. सोलापूर शहर सायबर पोलिसांकडे त्यांनी ऑनलाइन तक्रार केली असून पोलिसांनी त्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी बोलावले आहे.

तुमच्या कागदपत्रांद्वारे खरेदी केलेल्या सीमकार्डवरुन पॉर्न साईटला भेट देवून गुन्हा केला आहे. या प्रकरणी तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तुम्हाला व पतीला अटक होणार आहे. न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले असून त्यातून तुमची बदनामी होईल, अशी भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी सोलापुरातील एका नामांकित हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरला ६४ लाख रुपयाला फसविले होते.

एका बॅंक अधिकाऱ्यास देखील शेअर मार्केटच्या नावाखाली काही लाख रुपयाला फसविल्याचा गुन्हा सायबर पोलिसांकडे दाखल असून त्याचाही तपास सुरु आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असतानाच सायबर पोलिसांकडे आता एका बड्या व्यावसायिकाला एक कोटी ८० लाख रुपयाला फसविल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, सायबर गुन्हेगारांनी कशी फसवणूक केली, यासंदर्भातील सविस्तर माहिती पोलिसांनी हवी असून पोलिसांनी त्या व्यावसायिकाला बोलावले आहे.

सायबर गुन्हेगारांच्या अमिषाला बळी पडू नका

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास कमीत कमी दिवसात जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत आहेत. त्याला सुशिक्षित तरुणांसह व्यावसायिक, उद्योजक, सरकारी नोकरदार देखील फसवतात हे विशेष. प्रत्येकानी अनोळखी क्रमांकावरून आलेला कॉल, मेसेज याची खात्री केल्यास निश्चितपणे फसवणूक टाळता येईल.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, सोलापूर शहर

अवघ्या २५ दिवसांत १.८० कोटी गमावले

सोलापूर शहरातील व्यावसायिकाला एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉटस्‌ॲपवर मेसेज आला. त्याची शहानिशा न करताच त्या व्यावसायिकाने लिंकवर क्लिक करून लिंक उघडली. त्यानंतर पुढे पुढे गेल्यावर कमीत कमी दिवसांत जास्त लाभ मिळेल, या आशेतून त्यांनी टप्प्याटप्प्याने समोरील व्यक्तीच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन पैसे पाठवले. अवघ्या २५ दिवसांत त्या व्यावसायिकाने स्वत:जवळील एक कोटी ८० लाख रुपये त्या अनोळखी व्यक्तीला पाठविले. शेवटी व्हायचे तेच झाले, जादा पैसे तर सोडाच, स्वत:ची रक्कम देखील परत मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

Accident: खोपोलीजवळ बस अन् टेम्पोचा मोठा अपघात, ९ जण जखमी

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

SCROLL FOR NEXT