CM Eknath Shinde  sakal media
महाराष्ट्र बातम्या

Palghar Case : शिंदे सरकारचा मोठा निर्णय; साधू हत्याकांडाचा तपास CBI करणार

पालघरमधील या हत्याकांडानंतर देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

Palghar Mob Lynching Case : पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र सरकारनं मान्यता दिली आहे. याबाबत राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे शिंदे सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

पालघरमधील या हत्याकांडानंतर देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळ राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. मविआ काळात घडलेल्या या घटनेचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी भाजपकडून वेळोवेळी केली जात होती. अखेर सत्तातरानंतर या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपविला जाणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

16 एप्रिल 2020 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुशीलगिरी महाराज (35) आणि कल्पवृक्ष गिरी महाराज (70) आणि चालक नीलेश तेलगडे (30) हे देशव्यापी कोरोना लॉकडाऊन दरम्यान कारमध्ये बसून कांदिवलीहून सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. त्यावेळी गडचिंचिल गावात जमावाने या साधूंना चोर समजून बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

सुरूवातीला या प्रकरणाचा तपास पालघर पोलीस करत होते. त्यानंतर हे प्रकरण राज्य सीआयडी-गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या तपासावर शंका उपस्थित करत साधूंनी आणि संबंधित साधूंच्या कुटुंबियांना या प्रकरणाची सीबीआय आणि एनआयए चौकशीची मागणी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

IND vs NZ, Mumbai Test: भारतीय संघातून जसप्रीत बुमराह, तर न्यूझीलंड संघातून सँटेनर बाहेर; पाहा दोन्ही टीमच्या प्लेइंग-११

Google Fined: रशियाने गुगलला ठोठावला डॉलर 20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000चा दंड

Aslam Sheikh Education: "आधी बारावी अन् मग नववी..." काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या शिक्षणावरुन गोंधळ; भाजपच्या आरोपामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT