Recruitment  esakal
महाराष्ट्र बातम्या

Krushi Sevak Bharti 2023 : कृषिसेवक भरतीमुळे योजना शेतकऱ्यांना बांधावर! 2109 पदांची भरती जाहीर

संतोष विंचू

Krushi Sevak Bharti 2023 : शेतकऱ्यांचा सल्लागार आणि शेतकरीमित्र असलेल्या कृषिसेवकामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना, सल्ला अन् पीक व्यवस्थापन कळते. परंतु रिक्त पदांमुळे कृषिसेवकांनाही या कामाला मर्यादा येत आहेत.

मात्र आता कृषी विभागाने ही अडचण सोडविण्यासाठी पावले उचलले असून, राज्यात तब्बल दोन हजार १०९ कृषिसेवकांची भरती करण्याचे निश्चित झाले आहे. यात नाशिक जिल्ह्यात ३३६ पदे भरली जाणार आहेत. (2109 krushi sevak recruitment in state maharashtra news)

शेतकऱ्यांना योजना समजावून सांगणे, पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यासह कीटकनाशके, बियाणे, खतांचा सल्ला देण्यापासून तर योजनांची माहिती, कागदपत्रे आणि योजनांच्या लाभास निधी मिळवून देण्यापर्यंत सिंहाचा वाटा उचलणारा घटक म्हणजे कृषिसेवक! त्यातच शेती व कृषीशी संबंधित समस्या वाढल्याने कृषिसेवक शेतकऱ्यांचे जिवाभावाचे मित्रही बनत आहेत.

परंतु रिक्त पदांमुळे एका कृषिसेवकाकडे अनेक गावांचा कारभार असल्याने या कामालाही मर्यादा पडत होत्या. कृषिसेवकांच्या तब्बल दोन हजार ६३८ जागा रिक्त असल्याने अखेर कृषी विभागात शासनाने तब्बल साडेतीन वर्षांनंतर कृषिसेवक पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात आठही विभागांत ही पदभरती करण्याचे आदेश कृषी विभागाने काढले आहेत. यामध्ये दोन हजार १०९ पदांसाठी ही भरती होईल. कृषिसेवकाच्या संदर्भाच्या जाहिरातीही प्रसिद्ध झाल्या असून, लवकरच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तीन वर्ष कंत्राटी नियुक्ती

गट ‘क’ संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषिसेवक म्हणून सरळसेवेने भरली जाणार आहेत. राज्यात दोन हजार ६३८ पदे रिक्त असून, ८० टक्के म्हणजेच दोन हजार १०९ पदे भरण्यात येतील. कृषिसेवकांना १६ हजार रुपये प्रतिमहा एकत्रित मानधन देण्यात येणार असून, तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती देण्यात येणार आहे.

बेरोजगारांना मिळणार संधी

कृषी पदवी व पदविका घेतलेले अनेक बेरोजगार असून, ते विविध कृषी कंपन्यांत कार्यरत आहेत. त्यांना आता शासकीय सेवेत नोकरीची संधी मिळणार आहे. या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहे.

अर्थात जाहिरात प्रसिद्ध झाल्या, मात्र अर्ज दाखल करण्यासंदर्भात स्वतंत्रपणे पुन्हा सूचना प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. अनुसूचित क्षेत्राबाहेरील आणि क्षेत्रातील प्रवर्गातील ही भरती होईल. कृषिसेवक पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादा ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे आहे.

...अशी होईल परीक्षा

अर्ज दाखल केल्यावर संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व या विषयाची प्रत्येकी २० गुणांची, तर कृषीविषयक १२० गुण अशी २०० गुणांची परीक्षा होईल. यासाठी १४० वस्तुनिष्ठ आधारित प्रश्न असतील. भरतीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना ९०० रुपये, अमागासवर्गीय उमेदवारांसाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे.

"शेतकऱ्यांचा मित्र म्हणून कृषिसेवकांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असून, शेतीविषयक अडीअडचणी व योजनांची माहिती कृषिसेवकांकडूनच मिळते. त्यामुळे रिक्त पदी भरती होऊन कृषिसेवक नियुक्त होणार असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. विशेषतः कृषी पदविका व पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे नोकरीची संधी मिळणार आहे. शासनाचा स्वागतार्ह निर्णय आहे." - डॉ. दिनेश कुळधर, प्राचार्य, एसएनडी कृषी महाविद्यालय, बाभूळगाव

रिक्त पदे व भरतीची पदसंख्या

विभाग --- रिक्त पदे --- पदसंख्या

नाशिक --- ४२० --- ३३६

ठाणे -- ३६८ --- २९४

पुणे --- २३५ --- १८८

कोल्हापूर --- ३१३ --- २५०

अमरावती --- २८४ --- २२७

छत्रपती संभाजीनगर --- २४५ --- १९६

लातूर --- २१३ --- १७०

नागपूर --- ५६० --- ४४८

एकूण --- २६३८ --- २१०९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

SCROLL FOR NEXT