Ujjani Dam saka
महाराष्ट्र बातम्या

पुणे जिल्ह्यातील 22 धरणे अजूनही 35 टक्क्यांवरच! उजनी उणे 34 टक्क्यांवर, महापालिकेचे दुबार पंपिंग बंद; उजनी धरणात आता 45.30 TMC पाणी

आता उजनी धरण उणे ३४ टक्क्यांवर आल्याने महापालिकेने गुरुवारी (ता. ११) धरणावरील दुबार पंपिंग बंद केले. त्यामुळे पंपिंगवर दरमहा होणारा महापालिकेचा २५ लाखांचा खर्च थांबला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरणात सध्या चार हजार क्युसेक विसर्ग जमा होत आहे. उन्हाळ्यात उणे ६० टक्क्यांवर पोचलेली धरणाची पातळी आता उणे ३४ टक्क्यांवर आली आहे. धरण उणे ३५ टक्क्यांवर आल्यानंतर २५ मार्च रोजी महापालिकेने धरणावर दुबार पंपिंग सुरू केले होते. आता उजनी धरण उणे ३४ टक्क्यांवर आल्याने महापालिकेने गुरुवारी (ता. ११) धरणावरील दुबार पंपिंग बंद केले. त्यामुळे पंपिंगवर दरमहा होणारा महापालिकेचा २५ लाखांचा खर्च थांबला आहे.

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून असून शहराला जेव्हा गरज पडेल, त्यावेळी भीमा नदीतून पाणी सोडावे लागते. सोलापूरजवळील औज, चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्यात ०.८० टीएमसी पाणी मावते, पण तिथपर्यंत पाणी पोचण्यासाठी धरणातून साधारणत: पाच टीएमसी पाणी सोडावे लागते. दुसरीकडे धरणावरील महापालिकेच्या जुन्या पाइपलाइनमधूनही दररोज पाणी घेतले जाते. तरीदेखील शहराचा पाणीपुरवठा चार-पाच दिवसाआडच आहे. महापालिकेचे सार्वजनिक अभियंता व्यंकटेश चौबे यांच्या नेतृत्वात उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन व्यवस्थित झाल्याचे पाहायला मिळाले. धरण उणे ६० टक्क्यांवरून उणे ५० टक्क्यांखाली आल्यानंतर लगेचच तिबार पंपिंग बंद करण्यात आले आणि त्यातून महापालिकेची अंदाजे ६५ लाख रुपयांची बचत झाली. आता दुबार पंपिंग बंद करण्यात आले आहे.

ठळक बाबी...

  • शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी २५ मार्च रोजी महापालिकेने धरणावरून सुरू केले होते दुबार पंपिंग

  • १५ मे रोजी धरण उणे ५१ टक्के झाल्याने सुरू करावे लागले होते तिबार पंपिंग

  • धरण क्षेत्रातील पावसामुळे १४ जूनला धरण पुन्हा उणे ५० टक्क्यांवर आले आणि तिबार पंपिंग बंद झाले

  • आज (गुरुवारी) धरण उणे ३५ टक्क्यांखाली आल्याने महापालिकेने दुबार पंपिंगही बंद केले

पुणे जिल्ह्यातील धरणे अजूनही तळाशीच

पुणे जिल्ह्यात भीमा खोऱ्यात उजनीसह पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर, नाझरे अशी एकूण २६ धरणे आहेत. ही धरणे हाउसफुल्ल झाल्यानंतर उजनी धरणाकडे मोठा विसर्ग येतो. पण, पावसाळा सुरू होऊन महिना संपला तरीदेखील कळमोडी (४० टक्के), वडिवळे व खडकवासला (५१ टक्के) ही तीन धरणे वगळता उर्वरित २३ धरणांमध्ये अजूनही ३५ टक्क्यांवर पाणीसाठा नाही. त्यामुळे उजनी धरणाला प्लसमध्ये येण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT