maratha reservation sakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एकानं जीवन संपवलं, 25 वर्षीय तरुणानं उचलंल टोकाचं पाऊल

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकीकडे मराठा समाज आक्रमक झाला आहे. काही भागांमध्ये आंदोलने, साखळी उपोषणे केली जात आहेत, तर काही भागात तोडफोडीच्या घटना घडल्या. हे आंदोलन थांबलं मात्र, मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आत्महत्या काही थांबायला तयार नाहीत. नांदेडमधील आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे.

नांदेडमधील एका 25 वर्षीय तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विष प्रशान करून आत्महत्या केली आहे. या तरूणाने 11 नोव्हेंबरला विष प्रशान केलं होतं. त्यानंतर त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं होतं.

या तरूणाच्या जवळ एक सुसाईड नोट देखील आढळली आली. सुसाईड नोटमध्ये समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असं लिहलं आहे. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

आत्महत्या करणार हा तरूण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता, त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. तसेच या तरूणाच्या वडिलांनी त्यांची दीड एकर शेती विकली होती, असं मृताच्या भावानं सांगितलं, शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करू, असं तहसीलदार विजय आवधान यांनी सांगितलं आहे. यासंबधीचे वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तसंस्थेने दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: 'धनगर ऐवजी धनगड' परिपत्रक मागे ते पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 जागांची सोडत जाहीर

अग्रलेख : नीतिमूल्यांचा ‘ताज’

Wild Animal : वन्यजीवांच्या संख्येत होतेय घट; गेल्या ५० वर्षांत सरासरी ७३ टक्क्यांनी कमी

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

SCROLL FOR NEXT