26/11 Mumbai Attack Heros esakal
महाराष्ट्र बातम्या

26/11 Mumbai Attack Heros : तिने त्या गर्भवती महिलांना लपवले नसते तर... वाचा 26/11 च्या ‘हिरो’ज ची कहाणी

मुंबई दहशतवादी हल्ला या घटनेला आज १४ वर्ष

सकाळ डिजिटल टीम

26/11 Mumbai Attack Heros : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला. या घटनेला आज १४ वर्ष पूर्ण होत आहेत. अनेक वर्ष लोटली तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात याच्या कटू आठवणी जिवंत आहेत. लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले होते.

२६ नोव्हेंबरच्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली. हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केलं होतं. या घटनेत लोकांचे जीव वाचवण्यासाठी अनेक लोक पुढे आले. या वेदनादायक घटनेनंतर लोकांच्या जिद्दीच्या अनेक गोष्टी समोर आल्या. ज्यांनी लोकांना हे डोंगरासारखे दु:ख सहन करण्याची हिंमत दिली. चला तर मग जाणून घेऊया अशा कथांबद्दल ज्यांनी हल्ल्यातील पीडितांना आशेचा किरण दाखवला.

ताज हॉटेलमध्ये मॅनेजर मल्लिका जगड

मल्लिका जगड ही तरूणी ताज हॉटेलमध्ये असिस्टंट बँक्वेट मॅनेजर होती. ताजमध्ये अचानक झालेल्या दहशतवादी हल्ला सर्वांनाच भांभावून सोडणारा होता. तेव्हा हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या सुमारे 60 पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मल्लिकाने उचलली. जीवाची पर्वा न करता तिने हॉटेलमधील पाहुण्यांना किचनमध्ये लपवले आणि दुसऱ्या मार्गाने बाहेर पडण्यास मदत केली.

धाडसी परिचारिका अंजली कुलथे

मुंबईत ताज हॉटेलसह कामा हॉस्पिटलमध्येही दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. त्यावेळी कामा हॉस्पिटममध्ये काम करत असलेल्या अंजली कुलथे या परिचारीका उशीरा ड्युटीवर आल्या. त्यावेळी त्यांना हॉस्पिटलचे गार्ड रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तेव्हा गांभिर्य़ ओळखून अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांनी त्या गार्डला गोळ्यांनी छिन्नविछिन्न करून आधीच हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला होता. पण ते प्रसूतीपूर्व वॉर्डात जाण्यापूर्वी अंजलीने त्या वॉर्डचा दरवाजा बंद केला. दहशतवाद्यांनी दारात गोळीबारही केला. यादरम्यान अंजलीने धाडस दाखवत सर्व गरोदर महिलांना वॉर्डातील एका छोट्या जागेत पाठवले. त्यामूळे त्या महिलांचा जीव वाचू शकला.

पोलिस श्वाय मॅक्स

मॅक्स, टायगर, सुलतान आणि सीझर ही कुत्र्यांची नावे आहेत. जे २००८ मध्ये मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोध आणि निकामी पथकात स्निफर डॉग होते. २६/११ च्या हल्ल्यादरम्यान ताज हॉटेलजवळ पोलिस लॅब्राडोर मॅक्सला ८ किलो आरडीएक्स सापडले. हॉटेलजवळ गोफणीच्या पिशवीत लपवून ठेवलेली स्फोटके बाहेर काढून त्याने असंख्य जीव वाचवले. मॅक्सच्या शौर्यामुळे त्याला अमिताभ बच्चन यांच्या हस्ते बोलशोई सुवर्णपदक देण्यात आले. 2016 मध्ये मॅक्सने या जगाचा निरोप घेतला.

सरला पारेख

या भीषण दहशतवादी हल्ल्यात सरला पारेख यांनी आपला मुलगा आणि सून गमावले. तरूण मुला आणि सुनेच्या निधनानंतर सरला खचून गेल्या होत्या. पण त्यांनी स्वत:ला सांभाळले. दोन नातवंडांची काळजी घेत त्यांनी मुंबईला चांगली सुरक्षा मिळावी यासाठी लढा दिला. सरला यांनी मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आरटीआय दाखल केले. या कामात त्यांना माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्या एनजीओ पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्टची मदत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

कऱ्हाड उत्तर-दक्षिण मतदारसंघांत आघाडी धर्म? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील एकाच व्यासपीठावर; दोन्ही गटांनी घेतलं जुळवून!

Election Voting : मतदान कार्ड नाहीये? चिंता कशाला, या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्रांद्वारे करा मतदान

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT