Vidhansabha Election sakal
महाराष्ट्र बातम्या

विधानसभेपूर्वी आमदारांना प्रत्येकी 3.20 कोटी! 2 कोटी रूपयांचा निधी वितरित, पण आमदारांना सुचवता येणार सव्वातीन कोटींची कामे; दीड महिने दिसणार भूमिपूजनाचा सपाटा

तात्या लांडगे

सोलापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ सप्टेंबरनंतर जाहीर होवू शकते, याअनुषंगाने राज्य सरकारने विधानसभा आमदारांना एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांसाठी प्रत्येकी तीन कोटी २० लाख रुपयांचा विकासनिधी देण्यास मंजुरी दिली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात दोन कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीकडे प्राप्त झाला असून आचारसंहितेपूर्वी आमदारांना मतदारसंघातील सव्वातीन कोटींची विकासकामे सुचविण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात २८८ तर सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ आमदार असून त्यातील एक आमदार ‘शहर मध्य’च्या प्रणिती शिंदे खासदार झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित १० आमदारांसाठी राज्य स्तरावरून प्रत्येकी दोन कोटींप्रमाणे २० कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

खासदार प्रणिती शिंदे यांना यात निधी आला नाही, पण त्यांनी यापूर्वी सुचविलेल्या कामांसाठीचा प्रलंबित अंदाजे एक कोटींचा निधी देखील शासनाकडून मिळाला आहे. लोकसभा निवडणूक व निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आमदारांना यंदाच्या आर्थिक वर्षाचा विकासनिधी मिळाला नव्हता. दरवर्षी आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रत्येकी पाच कोटींचा निधी मिळतो. पण, आता सप्टेंबरमध्ये आगामी विधानसभेची आचारसंहिता जाहीर होणार असल्याने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांचा निधी मिळाला आहे.

अडीच कोटींऐवजी ३.२० कोटींचा निधी

प्रत्येक आमदारांना राज्य सरकारकडून दरवर्षी मतदारसंघातील विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी दिला जातो. आता चालू आर्थिक वर्षाच्या निम्म्या वर्षातच पुढील विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सहा महिन्यांचे अडीच कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना देखील राज्य सरकारने सर्वच आमदारांना प्रलंबित विकासकामांसाठी तीन कोटी २० लाख रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. सध्या दोन कोटी वितरित केले आहेत, पण त्यांना त्यांच्या मतदारसंघातील तीन कोटी २० लाखांची कामे सुचविण्याचे अधिकार दिले आहेत.

दीड महिने दिसणार भूमिपूजनाचा सपाटा

२०२४-२५ आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून आमदारांना मतदारसंघातील विकासकामांसाठी काहीच निधी मिळाला नव्हता. पण, आता सव्वातीन कोटींची कामे करण्यास तथा सुचविण्यास आमदारांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता आगामी दीड महिन्यात (विधानसभा आचारसंहितेपर्यंत) सर्वच विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या हस्ते विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटा पाहायला मिळेल हे निश्चित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT