rajeshtope 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील ३३ हजार रुग्णांना ‘डिस्चार्ज’;४१ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यात गुरुवारी एक हजार ३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आत्तापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज कोरोनाच्या दोन हजार ९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खासगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या पाच लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात पाच लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक विलगीकरण सुविधांमध्ये ७३ हजार ४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

१२३ रुग्णांचा मृत्यूची 
राज्यात आज १२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य मंडळ निहाय मृत्यू ः ठाणे- ६८ (मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई ६, वसई विरार १, पालघर १, पनवेल १), नाशिक- २५ ( धुळे १, जळगाव २१, नाशिक ३), पुणे- १६ (पुणे ९, सोलापूर ७), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २) औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर- ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), अकोला-३ (वाशिम २, यवतमाळ १). 

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७१ रुग्ण आहेत तर ४४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२३ रुग्णांपैकी ९२ जणांमध्ये ( ७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २७१० झाली आहे. 

महाराष्ट्राच्या  बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते १ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९३ मृत्यूंपैकी मुंबई ४०, जळगाव -१६, ठाणे ८, सोलापूर -६, नवी मुंबई -५, रायगड -३, परभणी २, नाशिक २, वाशिम -२ , औरंगाबाद -२,पनवेल १, पालघर -१ , वसई विरार -१ उस्मानाबाद -१, धुळे -१,नांदेड १ आणि यवतमाळ – १ असे मृत्यू आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT