दोन महिन्यात सोडले १०५ टीएमसी पाणी
उजनी धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर पूरनियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडून देण्यात आले. ४ ऑगस्टपासून आतापर्यंत धरणातून तब्बल १०५ टीएमसी पाणी नदी, कालवा, उपसा सिंचन योजनांमधून सोडून देण्यात आले आहे. तरीदेखील अद्याप काही बंधारे, मध्यम-लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नसल्याची स्थिती आहे.सोलापूर : उजनी धरण सध्या ११० टक्क्यांपर्यंत भरले असून धरणात दौंडवरून नऊ हजार क्युसेकची आवक आहे. उजनीतून सध्या भीमा नदीतून १० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत असून याशिवाय धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील दररोज १६०० क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. त्यातून दररोज तीन लाख युनिट विजेची निर्मिती होते. ४ ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास एक कोटी ७४ लाख युनिट वीज तयार झाली असून त्याची अंदाजे किंमत सहा कोटींपर्यंत आहे.
जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत उणे पातळीतील उजनी धरण अवघ्या १० ते १२ दिवसांत १०० टक्के भरले आणि ४ ऑगस्टपासून धरणातून भीमा नदीसह कालवा, बोगदा व उपसा सिंचन योजनांमधून अतिरिक्त पाणी सोडून द्यावे लागले. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने ते सगळे पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. समाधानकारक बाब म्हणजे धरणातून पाणी सोडायला सुरवात झाल्यापासून तेथील विद्युत प्रकल्पातून दररोज तीन लाख युनिट (प्रतितास १२५०० युनिट) विजेची निर्मिती होत आहे. ‘महावितरण’कडून ही वीज साधारणत: साडेतीन रुपये प्रतियुनिट या दराने खरेदी केली जाते.
यंदाच्या पावसाळ्यात त्या प्रकल्पातून साडेतीन कोटी युनिट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. पण, जून-जुलैपर्यंत धरण उणे साठ्यात असल्याने त्या काळात वीजनिर्मिती होऊ शकली नाही. ४ ऑगस्टपासून वीज तयार करण्यास सुरवात झाली असून काही दिवसांपूर्वी पावसाचा खंड पडला होता, त्यावेळी दोन दिवस तांत्रिक कारणास्तव वीजनिर्मिती बंद होती. आता पुन्हा वीजनिर्मिती सुरू झाली असून शेतकऱ्यांसाठी देखील धरणातून दोन महिन्यांपासून कालवा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्यात येत आहे. आता १५ ऑक्टोबरपूर्वी कालव्याचे पाणी बंद केले जाणार असून त्याचवेळी धरणातील पाण्याचे नियोजन निश्चित होणार आहे.
उजनी धरणाची सद्य:स्थिती
एकूण पाणीसाठा
१२२.५१ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
५८.८४ टीएमसी
धरणातून सोडलेला विसर्ग
११,६०० क्युसेक
उजनीत येणारी आवक
९,००० क्युसेक
दोन महिन्यात धरणातून सोडले १०५ टीएमसी पाणी
उजनी धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर पूरनियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडून देण्यात आले. ४ ऑगस्टपासून आतापर्यंत धरणातून तब्बल १०५ टीएमसी पाणी नदी, कालवा, उपसा सिंचन योजनांमधून सोडून देण्यात आले आहे. तरीदेखील अद्याप काही बंधारे, मध्यम-लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नसल्याची स्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.