mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

कॉलेजमधील लाडक्या भावांना आता दरमहा 6000 ते 10000 विद्यावेतन; ‘महास्वयम्‌’वर करावी लागणार नोंदणी; विद्यावेतनासाठी विद्यार्थ्यांना ‘या’ अटी लागू

तात्या लांडगे

सोलापूर : शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळविण्यासाठी सुरवातीला आवश्यक अनुभव नसल्याने अनेक तरुणांना अपेक्षित नोकरी मिळत नाही. त्यासाठी त्यांचे हाल होतात व अनेक तरुण मिळेल ते काम स्वीकारतात. त्या लाडक्या भावांसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली आहे. योजनेच्या लाभासाठी बारावी ते पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘महास्वयम्‌’ पोर्टलवर नोंदणी बंधनकारक असून, त्याची कार्यवाही पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे.

महाराष्ट्रात १८ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या दोन कोटी ३५ लाखांपर्यंत आहे. नोकऱ्या मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुभवाअभावी बहुतांश तरुणांना रोजगार मिळत नाही. युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ शासनाने हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत. या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रातील आस्थापना किंवा उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.

योजनेंतर्गत सेवा क्षेत्रासाठी एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या २० टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना किंवा उद्योग महामंडळात एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या पाच टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येणार आहेत.

नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी...

  • कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या ‘महास्वयम्‌’ पोर्टलवर नोंदणी करावी

  • कंपन्यांनी योजनेंतर्गत त्याच पोर्टलवर करावी नोंदणी, निवडीचे अधिकार आस्थापनांना

  • किमान तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या उद्योग किंवा आस्थापनांनाच करता येईल नोंदणी

  • सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी कंपनीने त्याच पोर्टलवर करायची आहे

  • १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींना नोंदणी करता येणार, शैक्षणिक पात्रता किमान बारावी

  • योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा

विद्यार्थ्यांच्या योजनेचे स्वरूप

  • इयत्ता बारावी : प्रतिमहा सहा हजार रुपये

  • आयटीआय, पदविका उत्तीर्ण विद्यार्थी : दरमहा आठ हजार रुपये

  • पदवीधर व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थी : प्रतिमहा १० हजार रुपये

सोमवारी महाविद्यालयांचे प्राचार्य, उद्योजकांसमवेत बैठक

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षणार्थींना पात्रतेनुसार सहा ते दहा हजारांपर्यंत विद्यावेतन मिळणार आहे. त्यासंबंधीची सोमवारी (ता. २२) दुपारी बैठक होणार आहे. खासगी उद्योग, योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना किंवा उद्योगांची नोंदणी होईल. त्यांना गरजेनुसार पात्र विद्यार्थ्यांची ऑफलाइन, ऑनलाइन निवड करता येईल. योजनेची अंमलबजावणी आता सुरू झाली असून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘महास्वयम्‌’ पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

- हनुमंत नलावडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT