कांदा आवक sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात दोन दिवसांत ६५९ गाड्या कांदा आवक! नवीन कांद्याला प्रतिक्विंटल २ ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव तर जुन्या कांद्यासाठी पाच हजार रुपयांपर्यंत दर

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर बाजार समितीत सोमवारी ३२५ तर मंगळवारी (ता. ८) ३३४ गाड्या कांदा आवक नोंदविण्यात आली. यावेळी जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. तर नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत सोमवारी दोन हजार ते चार हजारांपर्यंत भाव होता. पावसाने भिजलेल्या कांद्याला प्रतिकिलो १० ते १५ रुपयांचा दर मिळाला.

सोलापूर बाजार समितीत सध्या नगर, नाशिक, धाराशिव, पुणे जिल्ह्यातून जुना कांदा येत आहे. सोमवारी आवक झालेल्या ३२५ गाड्यांमध्ये २०० गाड्या जुना कांदा होता तर १२५ गाड्या नवीन कांदा होता. मंगळवारी देखील आवक वाढली होती. म्हसवड, फलटण, माळशिरस, कर्नाटक, बागलकोट, विजयपूर, कलबुर्गी येथून नवीन कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. आवक वाढल्याने १५ दिवसांपूर्वीचा दर सध्या राहिलेला नाही.

साडेपाच हजार रुपये क्विंटलने जाणारा कांदा आता आवक वाढल्याने तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील नवीन कांदा बाजारात यायला अजून एक महिन्याचा अवधी आहे. तत्पूर्वी, दर कमी झाल्याने बळिराजाची चिंता वाढू लागली आहे. त्यातच पुन्हा शेतकऱ्याला विकलेल्या कांद्याचे बिल रोखीने मिळत नाही. किमान १५ हजार रुपयांपेक्षा जास्त बिल झाल्यास त्यांना १५ दिवसांची तारीख टाकलेला धनादेश (चेक) दिला जात असल्याची वस्तुस्थिती आहे.

बंगळुरुच्या बाजारात एक हजाराहून अधिक गाड्यांची आवक

सोलापूर बाजार समितीत मागील दोन दिवसांत ६५९ गाड्या कांदा आला होता, तर बंगळुरु बाजारात एक हजाराहून अधिक गाड्यांची आवक नोंदविली गेली. सध्या कर्नाटक परिसरातील नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणावर येत आहे. नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल कमाल दर साडेतीन ते चार हजार रुपये तर सरासरी दर दोन हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत आवक वाढली तरीदेखील कांद्याचे दर तेजीत राहतील असा विश्वास बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: राज्यात नेमकं चाललंय काय? वांद्रे परिसरात १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; एकाला अटक, दुसरा फरार

Latest Maharashtra News Updates : राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करा; भाजप नेत्याच्या याचिकेवर आज सुनावणी

PAK vs ENG 1st Test : ‘Root’ मजबूत! इंग्लंडच्या जो रूटने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; टॉफ फाईव्हमध्ये एकही भारतीय नाही

Jalebi History: भारतात जिलेबी आली कशी अन् नाव कसे पडले? राहुल गांधींच्या वक्तव्यावरून चर्चेत आलेल्या जिलेबीचा इतिहास काय?

Thane Politics: ठाण्यात भाजपमध्ये होणार बदल? इच्छुकांची मांदियाळी, भूमिपुत्रांना संधी देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT