7 month girl ariha shah separated from indian parents Fight against German government for custody of girl couple appealed to cm Eknath Shinde sakal
महाराष्ट्र बातम्या

Real life Norway vs Mrs Chatterjee : मुलीच्या ताब्यासाठी जर्मन सरकारविरुद्ध लढा; CM शिंदेकडे मागितली दाद

सात महिन्यांच्या अरिहा शहाचा ताबा तिच्या आईवडिलांपासून जर्मन सरकारने घेतला

सकाळ वृत्तसेवा

- पांडुरंग म्हस्के

मुंबई : सात महिन्यांच्या अरिहा शहाचा ताबा तिच्या आईवडिलांपासून जर्मन सरकारने घेतला त्यालाही आता १७ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. आता तिचे जर्मन भाषेतील बोबडेबोल तिच्या आईला धाराला कळतही नाहीत. लेकीचा ताबा मिळवण्यासाठी जर्मनीपासून भारतापर्यंतचे सर्व उंबरठे झिजवणाऱ्या तिच्या आईने जर्मन भाषा देखील शिकून घेत अरिहासोबतचे आपले बंध कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

पालघरमधील शहा दांपत्याच्या जर्मनीविरुद्धच्या लढ्यासाठी महाराष्ट्रातूनही पाठबळ मिळावे, यासाठी धारा शहाने राज्य सरकारला आवाहन केले आहे. आपल्या दोन वर्षांच्या मुलीचा ताबा जर्मन सरकारकडून मिळावा यासाठी भाईंदर येथे राहणारे शहा दाम्पत्य गेले सात महिने शासनाच्या विविध यंत्रणांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, सगळ्याच ठिकाणाहून त्यांच्या पदरी निराशा येत आहे.

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दरबारात या महिलेने आपली व्यथा मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. पेशाने इंजिनिअर असलेले भावेश शहा हे बर्लिन (जर्मनी) शहरामध्ये नोकरीनिमित्त राहत आहेत. सोबत त्यांची पत्नी आणि आई देखील राहते. तेथेच फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांना अरिहा झाली.

मुलीचे कोडकौतुक करण्याचे दिवस असताना अचानक सात महिन्यांच्या या चिमुरडीच्या खासगी भागाला खेळणे लागल्याने छोटी जखम झाली. त्यातच डायपर लावल्याने पुरळ आले. दवाखान्यात नेले असता, तेथील डॉक्टरांनी वेगळाच संशय व्यक्त करीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा निष्कर्ष काढत हे प्रकरण स्थानिक जर्मन बाल सेवा केंद्राकडे देऊन तिचा ताबा त्यांच्याकडे दिला.

तेव्हापासून सुरू झालेली शहा दाम्पत्याची परवड अद्यापही संपलेली नाही. चिमुरडीच्या अनेक चाचण्या न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आल्या. त्यातून असे काहीच झाले नसल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यानंतरही जर्मन सरकारने मुलीचा ताबा शहा दाम्पत्याकडे देण्यास नकार दिला. मात्र मुलीचा सांभाळ व्यवस्थित करू शकत नाहीत, असे वेगळेच कारण दिले. दरम्यानच्या काळात अरीहा दोष नसताना दत्तक संगोपन केंद्रामध्ये दिवस काढत आहे. आता लवकरच तिची रवानगी अनाथाश्रमात करण्यात येणार आहे.

एखाद्या चित्रपटात शोभावी अशी शहा दाम्पत्याची कथा आहे, अशाच घटनेवर हिंदीमध्ये नुकताच ‘नॉर्वे व्हर्सेस मिसेस चॅटर्जी’ हा चित्रपटही येऊन गेला आहे. मुलीचा ताबा मिळावा यासाठी जर्मन सरकारशी लढा दिल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने, शेवटी शहा कुटुंबीयांनी भारतात येऊन सरकारी यंत्रणांपुढे आपले गाऱ्हाणे मांडले आहे, मात्र येथेही अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. अखेर शेवटी मुख्यमंत्री शिंदे यांची आज लोकदरबारात भेट घेऊन आपली कैफियत मांडली.

यापूर्वी अनेकदा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे याबाबत दाद मागण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतही आमची समस्या पोचविण्याचा प्रयत्न केला. जर्मनीचे चॅन्सलर ओलॉफ स्कोल्झ यांच्याबरोबर फेब्रुवारी महिन्यात याबाबत बैठक घेऊन चर्चा केली. मात्र, त्यानंतरही पुढे काहीच न झाल्याने शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली आहे.

- धारा शाह, मुलीची आई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT