सरकार शिक्षकांना चांगल्या सोयीसुविधा देत आहे. मात्र, काही शिक्षकांकडून योजनांचा गैरफायदा घेतला जात आहे.
BJP MLA Prashant Bamb News : बोगस कागदपत्रं सादर करून घरभाडं वसूल करणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करा, अशी मागणी करून भाजप आमदार प्रशांत बंब यांनी वादाला तोंड फोडलं होतं. आता विधान परिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करून त्यांनी नवा वाद निर्माण केलाय. या वादानंतर आमदार बंब यांनी पत्रकार परिषदेत घेऊन खुलासा केला आहे.
पत्रकार परिषदेत बंब म्हणाले, सरकारी सुविधा असतानाही शिक्षणाचा दर्जा का सुधारत नाही. शिक्षकांना (Teacher) पाठिशी घालणाऱ्यांमुळं नुकसान होत आहे. शिक्षकांची मुलं त्यांच्याच शाळेत शिकली पाहिजेत तरच फायदा होणार आहे, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. राज्यातील 70 टक्के शिक्षक सरकारी योजनांचा गैरफायदा घेत आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. शाळेत शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देत नाहीत, असा माझा ठाम आरोप आहे.
बंब पुढं म्हणाले, शिक्षकांना माझं आवाहन आहे की, त्यांनी स्वत:च्या सोयीसाठी नोकरी करु नये. सरकार शिक्षकांना चांगल्या सोयीसुविधा देत आहे. मात्र, काही शिक्षकांकडून योजनांचा गैरफायदा घेतला जात आहे. राज्यातल्या चांगल्या शिक्षकांसाठी येत्या शिक्षक दिनी त्यांचा सर्वांनी गौरव करायला हवं. शिक्षक दिनी शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचं पूजन करावं आणि येत्या शिक्षक दिनी (Teachers Day) कृतज्ञता दिन म्हणून साजरा करावा, असं आवाहन त्यांनी शिक्षक समिती (Teachers Committee) सदस्यांना केलं आहे. गावच्या सर्व सरपंचांनी शिक्षकांच्या घरी जावून त्यांचं पूजन करावं, असंही त्यांनी आवाहन केलंय.
शिक्षकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वादंग आहे. कुणाचे काही गैरसमज झाल्याचंही वाटतं. राज्यातील 70 टक्के शिक्षक आपल्या मुख्यालयी राहत नाही. त्यामुळं शिक्षणाची गुणवत्ता ढासळत आहे. अनेक कारणांपैकी हेही एक कारण आहे. मुख्यालयी राहण्याचं आम्हाला बंधन नाही, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. त्यांना कुठेही राहून घर भाडं भत्ता मिळत आहे. मी औरंगाबादला गेलो. तेव्हा कार्यकारी अधिकारी यांनी बीआरसी कमिटीला सांगितलं की, 100 टक्के शिक्षक हे मुख्यालयी राहतात. त्यानंतर मी माझी 40-40 मुलं जिल्ह्यात पाठवली. प्रत्येक गावात जाऊन शिक्षकांची घरे पाहिली. तिथे शिक्षक राहत नव्हते. 90 टक्के शिक्षक त्याच गावात राहत नव्हते. शिक्षक हे धादांत खोटे बोलत आहेत. चुकीची कागदपत्रे सादर करून घरभाडे घेत आहेत, असा आरोपही आमदार बंब यांनी केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.