महाराष्ट्रातील मुलांमध्ये गोवर आजाराचं प्रमाण वाढत आहे.
कोरोनाचं आरोग्य संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा (Measles) उद्रेक होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलाय. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गोवर (Measles Outbreak In Mumbai) या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
प्रामुख्यानं लहान मुलांना या आजाराचा विळखा पडल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील मुलांमध्ये गोवर आजाराचं प्रमाण वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागानुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 717 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 303 प्रकरणं मुंबईत आढळून आली आहेत. आतापर्यंत या आजारानं महानगरात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
गोवर हा एक प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग आहे. हा आजार सहसा फक्त मुलांमध्ये होतो. त्यामुळं 28 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई स्थानिक संस्थेच्या बुलेटिननुसार, मंगळवारी मुंबईत गोवरच्या पाच नवीन रुग्णांची नोंद झालीय. संशयित आजारानं एकाचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे.
या वर्षी जानेवारीपासून नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 70 आणि मुंबईजवळील भिवंडीमध्ये 48 रुग्ण आढळले आहेत. या वर्षात आतापर्यंत मुंबईत गोवरच्या प्रादुर्भावाचे 74 रुग्ण आढळले आहेत.
गोवर आजाराचा संसर्ग होण्यापू्वी काही चिन्हं आणि लक्षणं रुग्णामध्ये आढळून येतात. सामान्यत: ही लक्षणं आढळून आल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपाययोजना सुरु करा. लक्षणं खालील प्रमाणं..
गोवर विषाणूच्या संपर्कात आल्यास साधारण 10 ते 12 दिवसांनी उच्च ताप सुरु होतो.
रुग्णाचा घसा खवखवतो, सातत्यानं खोकला येतो.
डोळ्यांच्या बुबळाचा पुढच्या भागात दाह होतो. खास करुन डोळे लाल आणि पाणचट होतात.
चेहऱ्यावर किंवा मानेच्या भागात त्वचेवर पुरळ येतात. हे पुरळ नंतर अंगभर पसरतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.