Cotton News esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : देशात कपाशीच्या साडेआठ लाख गाठींनी कमी उत्पादनाचा अंदाज; महाराष्ट्र कर्नाटकमध्ये उत्पादनात घट

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra News : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकमधील उत्पादनातील घटीमुळे २०२२-२३ च्या हंगामात साडेआठ लाख गाठींनी कमी म्हणजेच, ३१३ लाख गाठी कपाशीच्या उत्पादनाचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे वर्तविण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत १७० किलोच्या २६ लाख ८९ हजार गाठींच्या साठ्याची शक्यता वर्तविण्यात आली.

कपाशीचा हमीभाव मध्यम धाग्यासाठी सहा हजार ६२०, तर लांब धाग्यासाठी सात हजार २० रुपये क्विंटल असा आहे.

‘डिलिव्हरी' केंद्र राजकोटमध्ये ३५६ किलोच्या गाठीचा भाव ५८ हजार ९३५ रुपये असा राहिला. (8 and a half million bales of cotton production is estimated to be lower in country nashik news)

३० नोव्हेंबरला ६० हजार ३८०, तर ३१ जानेवारी २०२४ ला ६१ हजार ४० रुपये असा हा भाव राहण्याचा अंदाज असोसिएशनचा आहे. त्यासाठी कपाशीचा २९ मिलिमीटरचा धागा अपेक्षित आहे. राजकोटसोबत यवतमाळ, जालना, कंडी व मुंद्रा (गुजरात), आदिलाबाद (तेलंगणा) ही कपाशीची ‘डिलिव्हरी' केंद्रे आहेत.

असोसिएशनने १७० किलोग्रॅमच्या ३०० लाख गाठींच्या वापराचा अंदाज वर्तविला असून, गेल्या वर्षी ३१८ लाख गाठींच्या वापराचा अंदाज होता. याशिवाय, १७० किलोग्रॅमच्या १२ लाख गाठी कपाशीच्या आयातीचा अंदाज असून, २०२१-२२ मध्ये हाच अंदाज १४ लाख गाठींचा होता. १७० किलोग्रॅमच्या ३० लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज असून, २०२१-२२ च्या तुलनेत १३ लाख गाठींनी कमी आहे. स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्‍लेषणातून ही बाब पुढे आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मक्याला हमी भावापेक्षा अधिक भाव

छिंदवाडा (मध्य प्रदेश) हे ऑक्टोबर ते मार्चसाठी ‘डिलिव्हरी’ केंद्र निश्‍चित करण्यात आले आहे. त्याच्या जोडीला गुलाबबाग (बिहार), निझामाबाद (तेलंगणा), सांगली ही ‘डिलिव्हरी’ केंद्रे आहेत. मक्याला क्विंटलला एक हजार ९६२ रुपये असा हमीभाव निश्‍चित करण्यात आला. त्यापेक्षा मक्याला अधिक भाव मिळत आहे.

पशुखाद्य आणि औद्योगिक वापरासाठीचा मका निवडण्यात आला असून, छिंदवाडात मक्याचा क्विंटलचा भाव दोन हजार ८० रुपये असा राहिला. २० ऑक्टोबरला दोन हजार ९७, २० नोव्हेंबरला दोन हजार ११०, २० डिसेंबरला दोन हजार ११२, तर २० जानेवारी २०२४ ला दोन हजार १३५ रुपये क्विंटल असा भाव राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT