Narendra Modi sakal
महाराष्ट्र बातम्या

Government Medical College : राज्यातील ८ नव्या जीएमसीचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

राज्यातील नव्या आठ महाविद्यालयांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता.नऊ) दुरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे.

योगेश पायघन

छत्रपती संभाजीनगर - नव्याने सुरू झालेल्या राज्यातील ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या (जीएमसी) तिसऱ्या फेरीत केंद्रीय कोट्यातील १५ टक्के (१२० जागा) जागांच्या कोष्टकात (सीट मॅट्रीक्स) वाढवण्यात आल्या आहेत.

त्यामुळे तिसऱ्या फेरीत समुपदेशासाठी सहभागी विद्यार्थ्यांना या बुलडाणा, अंबरनाथ, हिंगोली, अमरावती, वाशिम, भंडारा, गडचिरोली, जालना या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी पसंती नोंदवून तिसऱ्या फेरीत निवड झाल्यास प्रवेशित होता येणार आहे. राज्यातील या आठही जीएमसी चे बुधवारी (ता. ९) दुपारी दीड वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे.

वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी नव्या आठ महाविद्यालयांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता.नऊ) दुपारी दीड वाजता दुरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे. त्यात राजशिष्ठाचारानुसार जिल्ह्यातील मान्यवरांना आमंत्रित करण्याचे आठही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता व संबंधीत आठही जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.

नवे आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यावर राज्य शासनाने २८ जुन २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले होते. या महाविद्यालयांसाठी आवश्‍यक रूग्णालये, महाविद्यालय इमारती, वैद्यकीय शिक्षक, सहाय्यक मनुष्यबळाची जुळवाजुळ करण्यात आली. त्यात अनेक त्रुटी होत्या.

त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) पहिल्या फेरीत परवानगी नाकारली. त्यानंतर त्रुटी पुर्तता करून दुसरे अपिल करण्यात आले. त्यावर केंद्रीय कुटुब कल्याण महाविद्यालयांना ३० सप्टेंबर रोजी लेटर ऑफ परमिशन (एलओपी) द्यायला सांगितले. तो पर्यंत दुसऱ्या फेरीची प्रक्रीया सुरू झाली होती.

वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय (डिएमईआर) आणि वैद्यकीय शिक्षण विभाग (एमईडी), महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी प्रवेश प्रक्रीयेत समाविष्ठ होण्यासाठी एनएमसीकडे धाव घेत प्रक्रीया पुर्ण करायला सुरूवात केली. एलओपी मिळाले, त्यासंबंधी राज्य शासनाच्या निर्णयाचा शुक्रवारी (ता. ४) आदेश पारीत झाले.

आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून सलग्नता प्रमाणपत्र मागण्यात आले असून त्यासाठी सोमवारी (ता. सात) संबंधित आठही महाविद्यलयांत पाहणी होईल. त्यानंतर सलग्नता प्रमाणपत्राची प्रक्रीया पुर्ण झाल्यावर राज्य कोट्याच्या ८५ टक्के जागा सीट मॅट्रीक्सवर वाढवण्यात येईल. ही प्रक्रीया बुधवार पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या फेरीत या दोन्ही कोट्यातील आठशे जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संधी उपलब्ध होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwa: केजरीवालांना मोठा धक्का! दिल्ली सरकारच्या मंत्र्याने दिला राजीनामा; भाजपचं नाव घेत पक्षावर आरोप

बापाच्या जिवावर कॉन्‍ट्रॅक्‍टर झालेल्या नारळफोड्याने माझ्यासमोर उभं राहून दाखवावं; आमदार गोरेंचा कोणाला इशारा?

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

Chh. Sambhajinagar Crime : नऊ तोळे सोने मोडले दुसऱ्याच्या नावाने, यशस्विनी पतसंस्थेच्या घोटाळ्याची न्यायालयात माहिती

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

SCROLL FOR NEXT