Maharashtra Budget Session : राज्यात फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२१ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८ हजार ५८४ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यात प्रामुख्याने ० ते ५ या वयोगटातील बालकांचा यात समावेश आहे, असं त्यांनी म्हटलं.
महाविकास आघाडी सरकारचे(MVA) अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. यावेळी प्रश्न-उत्तरांच्या तासात राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील बालकांच्या मृत्यूची माहिती दिली. (Rajesh Tope speaks on Child Death count of Maharashtra)
बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण नागपुर, मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. कोरोना काळात यामध्ये वाढ झाल्याचं समोर आलंय. महामारी आल्यानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्तेचे प्राधान्यक्रम तत्काळ बदलल्याने काही महत्वाचे विषय मागे पडल्याचं या आकडेवारीतून समोर आलं.
अधिकृत आकडेवारी
नागपूर -९२३
औरंगाबाद - ५८७
मुंबई शहर - ७९२
पुणे - ४२२
नाशिक - ४१७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.