Murlidhar MOHOl sakal
महाराष्ट्र बातम्या

पूर्ण लसीकरण झालेल्या 80 टक्के पुणेकरांना कोरोनाचा संसर्ग - महापौर

चिंता करण्याचे कारण नसले तरी आधीच्या निर्बंधांची अधिक सक्तीने अंमलबाजवणी करणार

निनाद कुलकर्णी

पुणे : एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Corona New Variant) वाढत्या रूग्णसंख्येने देशाची चिंता वाढवली आहे. (Omicron Cases In Pune) त्यात पुण्यामध्ये करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस (Covid 19 Vaccination) घेतलेले 80 टक्के लोक करोनाबाधित आढळत आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी (Pune Mayor Murlidhar Mohol On Covid Cases ) दिली आहे. नुकतीच पुणे महापालिकेची करोना आढावा बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मोहोळ बोलत होते. दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येमुळे चिंता करण्याचे कारण जरी नसले तरी, आधीच्या निर्बंधांची (Covid Restrictions In Pune ) अधिक सक्तीने अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुण्यातील रूग्णसंख्या एका आठवड्यात चौपट झाल्याचेदेखील यावेळी स्पष्ट केले.

मोहोळ म्हणाले की, आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे (No Major Symptoms In Omicron Patient ) दिसून येत नसून ओमिक्रोनच्या रुग्णांमध्येदेखील अगदी सौम्य लक्षणे दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यातील 3 लाख (Corona Vaccination In Pune) लोकांनी 84 दिवस उलटूनही दुसरा डोस घेतला नसून अशा नागरिकांपर्यंत महापालिका पोहोचणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मास्क तसेच नियमांच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथके तयार करण्यात येणार असून 10 जानेवारी पासून फ्रंट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेल्या रुग्णांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोहोळ म्हणाले की, शहरातील रुग्णांची संख्या अडीच हजारांवर गेली असून 75 ते 80 टक्के रुग्णांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र, त्या सर्वांना कोणताही त्रास नाहीये. शहरातील 2500 रूग्णांपैकी 300 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असून 80 रुग्ण ऑक्सिजनवर आणि 25 रूग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महापालिकेकडे मुबलक प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध असून, 4000 रेमडिसिव्हिर, 1800 बेड्स तसेच पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

गरज भासल्यास कोविड सेंटर सुरू करणार

शहरातील कोविड सेंटरबाबत (Covid Center In Pune) बोलताने ते म्हणाले की, वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, गरज भासल्यास कोविड केअर सेंटर सात दिवसांच्या नोटिसवरदेखील ते चालू केले जाऊ शकते. वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरिकांनी चिंता करण्याची गरज नसून यापूर्वीच्या निर्बंधांची अधिक सक्तीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT