Gautami Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil: व्हायरल झालेल्या 'त्या' विकृत घटनेनंतर गौतमी पाटील म्हणते आता मी...

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलताना व्हिडिओ व्हायरल झाला होता

अंकिता खाणे (Ankita Khane)

'सबसे कातील गौतमी पाटील' ही नाव अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर या सर्वांना आता माहिती झालं आहे. अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गौतमी पाटीलला या प्रसिद्धीचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वेग-वेगळ्या कारणाने गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या घृणास्पद घटनेने गौतमीसह अनेकांना धक्काच बसला. आता या विकृत घटनेनंतर तिच्यावर व्हॅनिटी व्हॅन वापरण्याची वेळ आली आहे. गौतमीचे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. याआधी पडद्याआडदेखील कपडे बदलून ती कार्यक्रमाला उभी राहत होती. पण त्या व्हायरल झालेल्या विकृत घटनेने तिला खडबडून जाग केलं आणि तिने कार्यक्रमाला आता व्हॅनिटी व्हॅन वापरायला सुरुवात केली आहे.

त्याचबरोबर कार्यक्रमात आता बाउन्सर देखील तिच्या व्हॅन भोवती दिसू लागलेत. आता गौतमी कार्यक्रमासाठी होकार देण्यापूर्वी व्हॅनिटीची व्यवस्था करण्याची मागणी करू लागली आहे. तसेच ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी किमान कपडे बदलण्यासाठी चार भिंतीची बंदिस्त खोली तरी द्यावी असं गौतमी सांगते. त्या विकृत घटनेनंतर आता गौतमी सावरली असून सावध देखील झाल्याचं दिसून येत आहे.

काल गौतमी पाटीलचा पंढरपुरात कार्यक्रम पार पडला. यादरम्यान मोठी गर्दी झाली. गौतमी स्टेजवर येताच अनेकांनी गोंधळ घालायला सुरवात केली. पोलिसांनी त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिति नियंत्रणात येऊ न शकल्यामुळे त्यांनी कार्यक्रम थांबवला.

यानंतर गौतमी पाटील बोलताना म्हणाली की,"माझा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे मी व्हॅनिटी वापरायला सुरुवात केली आहे". महाराष्ट्रात गावोगावी हजारोंच्या रेकॉर्डब्रेक कार्यक्रम करणाऱ्या गौतमीला आता इतर राज्यातूनही कार्यक्रमासाठी मागणी येऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT