uddhav thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: "अब की बार भाजप तडीपार," उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा घेतले शिंगावर

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. दरम्यान परभणीमध्ये शिवसेनेचे (UBT) उमेदवार खासदार बंडू जाधव यांच्या प्रचारादरम्यान ठाकरे यांनी भाजपला पुन्हा शिंगावर घेतले.

केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपवर ठाकरे यांनी सडकून टीका केली. यावेळी ठाकरे यांनी पुन्हा एकदा "अब की बार भाजप तडीपार असा नारा दिला."

यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातील उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वप्रथम माझे परभणीकरांना दंडवत. कारण हेच परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि तुम्ही त्याचे सैनिक आहात. भाजप आणि मिधेंना वाटले असेल की सर्वकाही पैशाने विकत घेता येते. पण परभणीकर पैशाने विकले जाऊ शकत नाहीत.

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला त्यांच्या प्रचार गीतातून जय भवानी-जय शिवाजी हा शब्द काढायला सांगितला होता. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, हा जो मोदी-शहांचा नोकर निवडणूक आयोग आहे त्याने गाण्यातून जय भवानी-जय शिवाजी काढायला सांगितला आहे.

"हा महाराष्ट्र मोदी-शहांना जय भवानी-जय शिवाजी म्हणत उठाबश्या काढायला लावल्याशिवाय राहाणार नाही. मोदी-शहांना महाराष्ट्राबद्दल इतका द्वेश का आहे?" असा सवालही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून विद्यामान खासदार बंडू जाधव लढत आहेत. तर महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर लढत आहेत.

शिवसेना फुटल्यानंतर अनेक आमदार खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाणे पसंत केले. मात्र, परभणीचे खासदार बंडू जाधव आणि आमदार राहुल पाटील यांनी ठाकरेंना साथ देणे पसंत केले आहे. त्यामुळे परभणीची जागा उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT