रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही त्यांनी याविषयी माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही दिले. (Accident Dapoli-Harne road in Ratnagiri district help of 5 lakhs each to relatives CM Eknath Shinde)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. 'रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही त्यांनी या अपघाताची माहिती घेतली. (Latest Marathi News)
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही दिले. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.' अशा आशयाचे ट्विट मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. (Latest Marathi News)
दापोली-हर्णै मार्गांवरील आसूद जोशीआळीजवळील वळणावर दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी डमडम व दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत डमडम चालक अनिल (बॉबी) सारंग यांच्यासह आठ प्रवाशांचा मृत्यू झाला.(Latest Marathi News)
यात दोन मुलांचा समावेश आहे. सर्व मृत प्रवासी पाजपंढरीजवळील अडखळ येथील आहेत. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी दोनच्या सुमारास सुमारास अनिल (बॉबी) हे त्यांची डमडम (एमएच-०८ ५२०८) हे दापोलीतून आंजर्लेकडे १४ प्रवासी घेऊन जात असताना त्यांची डमडम आसूद जोशीआळीनजीक असलेल्या वळणावर आली असता समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बाहेरून टर्न मारल्याने डमडम ट्रकवर आदळली.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.