accident on nagar kalyan highway 5 dead one serious  
महाराष्ट्र बातम्या

Nagar Kalyan Highway Accident: नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; ३ ठार, १ जण गंभीर जखमी

Nagar Kalyan Highway Accident: इनोव्हा आणि पीक अप कारची धडक

धनश्री ओतारी

Nagar Kalyan Highway Accident: नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर वाटखळे इथे पीक अप- इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात मिळालेल्या माहितीनुसार, ३ जणांचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. (accident on nagar kalyan highway 5 dead one serious )

मिळालेल्या माहितीनुसार, नगर-कल्याण महामार्गावरील वाटखळ येथे इनोव्हा गाडी क्रमांक एम एच ०५ ए.एस ६३३७ व मालवाहू पिकप गाडी क्रमांक एम एच १४ जी.डी ४०७४ या गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी आहे. (Latest Marathi News)

अपघाताची माहिती समजतात ओतूर पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांची टीम घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने जखमींना ओतूर येथील सरकारी दवाखान्यात आणले. परंतु त्यातील पाच जणांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घोषणा केली.

रात्री ९ वाजता माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखळ गावाजवळ पिकअप आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भयंकर होती की, इनोव्हा गाडीत असणाऱ्या सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातात पिकअप चालक थोडक्यात बचावला आहे. वाहनांचा वेग इतका प्रचंड होता की इनोव्हाची एअर बॅग तुटून बाजूला पडली आहे. (Latest Marathi News)

इनोव्हा गाडीच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने जुन्नर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मृतांची नावे अद्याप समोर आली नसून इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे चालली होती. तर पिकअप वाहन हे कल्याणच्या दिशेने चालले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT