road accident sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात दररोज ३५ जणाचा अपघाती मृत्यू! १७ जिल्ह्यांच्या प्रवासात ‘खतरा’

राज्यातील १७ जिल्ह्यांचा प्रवास अतिधोकादायक झाला असून सोलापूर, नाशिक, नागपूर, नगर, नांदेड, औरंगाबाद, सातारा, धुळे, अमरावती, नंदुरबार, ठाणे, पुणे, रायगड, नवी मुंबई या जिल्ह्यांचा प्रवास करताना सर्वाधिक अपघात आणि मृत्यू झाले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील महामार्गांवर तब्बल ६१० ब्लॅकस्पॉट असून ती ठिकाणे वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरली आहेत. १७ जिल्ह्यांचा प्रवास अतिधोकादायक झाला असून सोलापूर, नाशिक, नागपूर, नगर, नांदेड, औरंगाबाद, सातारा, धुळे, अमरावती, नंदुरबार, ठाणे, पुणे, रायगड, नवी मुंबई या जिल्ह्यांचा प्रवास करताना सर्वाधिक अपघात आणि मृत्यू झाले आहेत.

सोलापूर-पुणे, मुंबई-पुणे, नगर-नाशिक, मुंबई-नागपूर, सोलापूर-विजयपूर अशा विविध महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरवर्षी राज्यात विशेषत: राष्ट्रीय महामार्गांवर २५ ते २९ हजार अपघात होतात. चिंतेची बाब म्हणजे राज्यभरात दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी १२ ते १४ हजार वाहनचालकांचा अपघाती मृत्यू होतो. महामार्गांवर मदतीसाठी टोल फ्रि क्रमांकावर कॉल करण्याची सोय केल्याच्या बाता मारल्या जातात, पण त्या खाबांवरील यंत्रणा कोलमडल्याची वस्तुस्थिती आहे. प्रत्येक जिल्ह्यातील रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यासाठी सर्वच शासकीय विभागांची जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. खासदारांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा स्वतंत्र समिती आहे. तरीपण, वेळेवर बैठका होत नाहीत, बैठकांमधील चर्चा केवळ कागदावरच राहतात. त्यामुळेच राज्यातील अपघातप्रवण ठिकाणे कमी झालेली नाहीत. अकोला, भंडारा, बुलढाणा, लातूर, गडचिरोली, हिंगोली व उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये एकही ब्लॅकस्पॉट नाही. पण, उर्वरित २८ जिल्ह्यांपैकी १७ जिल्ह्यात वाढलेल्या ब्लॅकस्पॉटमुळे वाहनांचा प्रवास जीवघेणा बनला आहे.

सर्वाधिक ‘ब्लॅकस्पॉट’चे जिल्हे
सोलापूर (५८), नाशिक (५४), नागपूर (५०), नगर (४५), नांदेड (४०), औरंगाबाद (३६), सातारा (३५), धुळे (३४), अमरावती (३१), नंदुरबार (३०), ठाणे (२४), पुणे (२२), रायगड (२१), नवी मुंबई, सांगली, वर्धा व कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी १५ अपघातप्रवण (ब्लॅकस्पॉट) ठिकाणे आहेत.

अडीच वर्षातील अपघात अन्‌ मृत्यू

सन अपघात मृत्यू

२०२० २४,९७१ ११,५६९

२०२१ २९,४७७ १३,५२८

जुलै २०२२ १८,२७५ ८,२६८

एकूण ७२,७२३ ३३,३६५

अपघातानंतर तत्काळ मदत नाहीच

राज्यात मागील पाच-सहा वर्षांपासून दररोज सरासरी ३५ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतोय. अपघातातील जखमींना तत्काळ मदत मिळावी म्हणून १ मे २०२० रोजी ‘मृत्यूंजय’ योजना सुरु झाली. पण, योजनेचे अस्तित्वच दिसत नाही. ‘एमएसआरडीसी’ने आयआरबी कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून महामार्गांवरील जखमींना त्यांच्याकडून तत्काळ मदत होणे अपेक्षित आहे. तसेच स्थानिक पोलिस, महामार्ग पोलिस, वाहतूक पोलिस अशी संपूर्ण यंत्रणा असतानाही अपघात तथा मृत्यू कमी झालेले नाहीत, हे विशेष. दरम्यान, ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटेंना अपघातानंतर तब्बल एक तासभर मदत का मिळू शकली नाही, त्यासंदर्भातील सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. त्यानुसार रायगड पोलिस, महामार्ग पोलिस आणि ‘एमएसआरडीसी’ तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT