seven died in road accident in madhyapradesh sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात दररोज ३७ जणांचा अपघाती मृत्यू! १० महिन्यांत ११,२४९ जणांनी गमावला प्रवासात जीव

रस्ते अपघात कमी करण्याचा प्रयत्न होत असतानाच राज्यात दररोज सरासरी ३७ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. पुणे, नगर, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ, सोलापूर, औरंगाबाद, सांगली, नाशिक, अमरावती, बीड, जालना, रत्नागिरी व जळगाव या १४ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यूची नोंद महामार्ग पोलिसांत झाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : रस्ते अपघात कमी करण्याचा प्रयत्न होत असतानाच राज्यात दररोज सरासरी ३७ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. पुणे, नगर, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ, सोलापूर, औरंगाबाद, सांगली, नाशिक, अमरावती, बीड, जालना, रत्नागिरी व जळगाव या १४ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यूची नोंद महामार्ग पोलिसांत झाली आहे. १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या दहा महिन्यांत तब्बल ११ हजार २४९ जणांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यभर महामार्गांची कनेक्टिव्हीटी वाढली असून आणखी काही महामार्ग प्रस्तावित आहेत. पण, वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा दुप्पट झाला आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे मागील पावणेपाच वर्षांत राज्यातील विविध महामार्गांवरील अपघातात ६२ हजार ३९५ जणांनी जीव गमावला आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक रस्ते अपघात झाले असून त्यात साडेआठशे जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नगर या प्रत्येक जिल्ह्यातील मृतांची संख्यादेखील पाचशेहून अधिक आहे. जळगाव, नागपूर, बीड या जिल्ह्यात मागील दहा महिन्यांत बाराशे जणांना जीव गमवावा लागला आहे. २०१८च्या तुलनेत यंदा अपघात व मृत्यू वाढल्याचेही महामार्ग पोलिसांनी सांगितले. त्याचे प्रमुख कारण वाहतूक नियमांचे उल्लंघन हेच राहिले आहे. सिटबेल्ट नाही, हेल्मेटचा विसर, मद्यपान, लेन कटिंग, रात्रंदिवस वाहन चालवणे, अतिवेग, मोबाइल टॉकिंग, विरुध्द दिशेने वाहन चालवणे ही प्रमुख कारणे अपघात व मृत्यू वाढायला कारणीभूत ठरली आहेत. पुणे शहर, नाशिक व सोलापूर ग्रामीण आणि औरंगाबाद जिल्ह्यात यंदा अपघात वाढले आहेत.

जखमींना मिळत नाहीत वेळेत उपचार

हजारो कोटींचे महामार्ग उभारताना काही अंतरावर टोल नाके उभारले जातात. परंतु, त्याठिकाणी रुग्णवाहिकांची संख्या पुरेसी नसते. त्यामुळे काहीवेळात दोन-तीन अपघात झाल्यानंतर अनेकदा जखमींना वेळेवर मदत मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महामार्ग बनवताना वाहनचालकांना अडचणीवेळी टोल फ्रि क्रमांकावरून कॉल करून मदत मिळवता येईल म्हणून रिसिव्हर बसवले, पण आता ते गायब आहेत. त्यामुळे अनेकदा वेळेवर मदत मिळवणे कठीण होते.

अपघाताची चिंताजनक वर्षनिहाय स्थिती

  • सन अपघात मृत्यू

  • २०१८ ३५,७१७ १३,२६१

  • २०१९ ३२,९२५ १२,७८८

  • २०२० २४,९७१ ११,५६९

  • २०२१ २९,४७७ १३,५२८

  • २०२२ २४,९६० ११,२४९

  • एकूण १,४८,०५० ६२,३९५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

Meesho: आता टी-शर्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो... मीशोवर नेटकऱ्यांचा संताप! कंपनीनं काय दिलं स्पष्टीकरण?

Kartiki Yatra : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार

अखेर भुलभुलैय्या 3 ने सिंघम अगेनला टाकलं मागे; बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कार्तिकच ठरला अजयपेक्षा सरस

Nashik Vidhan Sabha Election : बंडखोरांच्या तलवारी म्यान; बहुतांश बहुरंगी लढती

SCROLL FOR NEXT