सोलापूर : महामार्गांच्या माध्यमातून वाहतूक सोयीची करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, तेच महामार्ग अपघाताचे सापळे बनले असून जानेवारी २०१९ ते २० मे २०२२ पर्यंत तब्बल ४३ हजार ८२३ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दररोज सरासरी ३५ ते २८ जणांचा अपघाती मृत्यू होत असल्याची चिंजानक माहिती समोर आली आहे. अतिवेग, पहाटेची डुलकी आणि रस्ते बांधणीतील त्रुटी, ब्लॅकस्पॉटवरील उपाययोजनांकडे दुर्लक्ष, या कारणांमुळे अपघात वाढल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.
सोलापूर-पुणे आणि पुणे-मुंबई, नाशिक, जळगाव, नागपूर, सातारा, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद या जिल्ह्यातील महामार्गांवर सर्वाधिक अपघात झाले आहेत. विशेष बाब म्हणजे अनेक अपघातांमध्ये पाचपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अमृतांजन पुलापासून ३९ किलोमीटरचा उतार आहे. त्याठिकाणी वाहनांचा वेग अधिक असल्याने अनेकदा ब्रेक लागत नसल्याने मोठे अपघात झाले आहेत. त्यासंदर्भात संबंधित विभागाशी महामार्ग पोलिसांनी अनेकदा पत्रव्यवहार केला. पण, काहीच ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. दिवसभ प्रवास करून थकलेले चालक पहाटे तीन ते पाच या वेळेत गाडी चालवितानाच झोपतात आणि त्यामुळेही अनेक अपघात झाले आहेत. अनेकजण वाहन चालविताना मोबाईलवर बोलतात तर काहीजण विरुध्द दिशेने प्रवास करतात. महामार्गांवर बंद पडलेली वाहनेदेखील अपघाताचे कारण ठरली आहेत. दुसरीकडे अनेक ठिकाणी महामार्गावर लाईटची गरज असतानाही ती बसविण्यात आलेली नाही. महामार्ग पोलिसांनी राज्य रस्ते विभागाला (एमएसआरडीसी) पत्र पाठवूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. ब्लॅकस्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) परिसरात उपाययोजना वेळेवर होत नाहीत, असेही महामार्ग पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आता समृध्दी महामार्गावर ताशी वेग १४० असणार आहे. त्यामुळे अपघात वाढतील, असाही अंदाज वर्तविला गेला आहे.
अपघाती मृत्यू सर्वाधिक असलेले जिल्हे
राज्यातील रस्ते अपघात सर्वाधिक असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुणे, अमरावती, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, बीड, सातारा, नागपूर, नगर, नाशिक, जळगाव, पालघर, मुंबई शहर १३ जिल्ह्यांचा समावेश आहे. मागील साडेतीन वर्षांत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रस्ते अपघात झाल्याची नोंद राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडे झाली आहे.
साडेतीन वर्षातील अपघात अन् मृत्यू
२०१९ २०२० २०२१ २० मे २०२२ पर्यंत
अपघात अपघात अपघात अपघात
३२,९२५ २४,९७१ २४,४९४ १०,८५३
मृत्यू मृत्यू मृत्यू मृत्यू
१२,७८८ ११,५६९ १३,५२८ ५८३८
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.