Tushar Bhosale Criticized Sharad Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

कंस अन् रावणाची प्रतिज्ञा टिकली नाही; तुम क्या चीज हो शरदबाबू?

.. त्यामुळंच शरद पवार यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतलाय - आचार्य भोसले

सकाळ डिजिटल टीम

.. त्यामुळंच शरद पवार यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतलाय - आचार्य भोसले

भाजपकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. 2024 च्या निवडणुकीतही महाराष्ट्रात (Maharasahtra) बहुमताने सत्तेत येऊ या भाजपाच्या दाव्यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. दरम्यान, आता त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाकडून (BJP) टीका होत आहे. भाजपाचे आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी कंस आणि रावणाची प्रतिज्ञा टिकली नाही तिथे 'तुम्हा काय चीज आहात शरद पवार जी?, असे म्हणत निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

यात ते म्हणतात, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होऊ न देता विरोधी पक्षनेता व्हायला भाग पाडलं यातूनच शरद पवार यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. हे त्यांनाही चांगलंच समजलं आहे. आज देवेंद्र फडणवीस हे सातत्याने ठाकरे सरकारचे पुराव्यानिशी वस्त्रहरण करत आहेत. त्यामुळे पुरत्या घाबरलेल्या खासदार शरद पवारांनी स्वतःला आणि नवख्या आमदारांना धीर देताना असं वक्तव्य केलं आहे की, 'घाबरू नका मी भाजपाला (BJP) पुन्हा सत्तेत येऊ देत नाही!. पण परिस्थिती अशी आहे की कंसाची आणि रावणाची जिथे अशी आसुरी प्रतिज्ञा टिकली नाही तिथे तुम क्या चिज हो शरद बाबू ? बुरा ना मानो होली है!, असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. या यशानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असून आता भाजपाने महाराष्ट्रातही सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यातील यशानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज्यात २०२४ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता येईल, असा दावा भाजपा नेते करत आहेत. या दाव्याला शरद पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, विधिमंडळातही भाजपाला आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT