मुंबई: विना मास्क फिरणा-या भाजप आमदारावर (BJP MLA Mangesh Chavan) आता पोलीसांनी कारवाई केली आहे. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर ही कारवाई झाली आहे. ते मंत्रालयाच्या आवारामध्य विनामास्क असताना पोलीसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. मंगेश चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत.
मंत्रालयातून बाहेर पडताना मास्क नसल्यानं त्यांच्यावर कारवाई करत पोलिसांनी त्यांच्याकडून २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, मास्क नाही म्हणून कारवाई केल्यानंतरच्या प्रतिक्रियेत त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात महावसूली सुरु असल्याचा आरोप केला. मात्र, आमदारांवर कारवाई करणा-या पोलीसांचं मंत्रालयात कौतुक केलं जात आहे.
याबाबात प्रतिक्रिया विचारली असता आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय की, मला असं वाटतंय की, कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. जर मी कायदा मोडला असेल आणि माझ्यावर कारवाई झाली तर वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. मी मास्क लावला नाही म्हणून 200 रुपये पोलिसांनी माझ्याकडून घेतलेत. या सरकारकडून वसूली सगळ्याच ठिकाणी जोरात चालू आहे, आपण पाहू शकतो. परंतु, या कायद्याच्या वसूलीचं मी निश्चितच स्वागत करेन. परंतु, आताच माझ्या मतदार संघात जर बघितलं तर, सर्वसामान्यांना कसं लुटलं जातंय याबाबतचं स्टींग ऑपरेशन मी स्वत: केलं होतं. त्यासंदर्भात देखील सरकारने गंभीर व्हावं तसेच दोषींवर कारवाई व्हावी. कायदा हा सगळ्यांना सारखा असू द्यावं. मला दंड झालाय म्हणून मला वाईट वाटण्याचं कुठलंही कारण नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.