Bacchu Kadu Esakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu: पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रात यात्रा काढली म्हणूनच त्यांच्या कारखान्यावर कारवाई; बच्चू कडूंचा खळबळजनक दावा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून जप्तीची कारवाई केली आहे. यापार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रात यात्रा काढली म्हणूनच त्यांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. (action against Pankaja Munde factory as she travels to Maharashtra claim of Bachu Kadu)

महाराष्ट्रात फिरल्यानं कारवाई

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यात यात्रा काढली आणि त्यानंतर त्यांच्या कारखान्यावर कारवाई सुरू झाली. म्हणजेच त्या महाराष्ट्रात फिरल्या त्यामुळं कारवाई सुरू झाली असेल, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

रोहित पवारांना टोला

श्रीकांत शिंदे हे भाजपाच्या तिकीटावर लढणार असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार भविष्य सांगत आहेत, याचं मला नवलचं वाटत आहे. कारण ते तर भविष्याच्या विरोधात असतात, असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी लगावला आहे.

चांगल्या गुरुजींसोबत आम्ही आहोत

वारे गुरुजींना मी पाठिंबा दिला होता. स्थानिक आमदार आणि तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी त्याचं निलंबन करण्यासाठी पाठपुरावा केला होता. वारे गुरुजींवर वार करणे चुकीचे होतं, चांगल्या गुरुजींसोबत आम्ही उभे राहणार, जे काम करत नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT